बुधवार पहाटेपासून मुंबईला पाऊस झोडपून काढत आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत असले तरीही पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईच्या अनेक भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावरूनच भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे.
ट्विटरच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या सेलिब्रिटीजवर निशाणा साधत एका दगडात दोन पक्ष्यांवर हल्ला चढवला आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या कारभारालाही त्यांनी लक्ष्य केले आहे. पहिल्याच पावसात मुंबईच्या विविध भागात साचलेल्या पाण्याचे फोटो राणे यांनी आपल्या समाज माध्यमांवरील खात्यांवर शेअर केले आहेत.
हे ही वाचा:
मराठा मोर्चापूर्वी १५ जूनला ओबीसी मोर्चा
काँग्रेसला मोठा धक्का; जितिन प्रसाद भाजपात
मुळशीमधील कंपन्यांत घुसून पाहणी करु
ठाकरे सरकारची निष्क्रियता; अस्मिता योजनेचा उडाला बोजवारा
तर त्यासोबत टीकास्त्र डागताना राणे म्हणतात, ‘मुंबई महापालिकेच्या आणि बेबी पेंग्विनच्या कामाचे गोडवे गात ट्विट करणारे आणि इंस्टाग्राम पोस्ट करणारे सेलिब्रिटी याबद्दल बोलतील का? असा सवाल राणे यांनी केला आहे. की मुंबई बद्दलचे प्रेम हे मिळणाऱ्या पैेश्याइतके मोठे नाही असा टोला राणे यांनी लगावला आहे.
Can those paid celebs who tweet and post on Instagram abt the great work of @mybmc n baby penguin.. pls speak abt this too?
Or the love for Mumbai city is not as big as the greed for money n lies! pic.twitter.com/hMxzN9Wad4— nitesh rane (@NiteshNRane) June 9, 2021
बुधवार, ९ जुन रोजी मुंबईत पडलेल्या पावसात शहराच्या अनेक भागात दरवर्षीप्रमाणे पाणी साचून जनजीवन विसकळीत झाले. सायन गांधी मार्केट, हिंदमाता, किंग्स सर्कल, वडाळा अशा मुंबईच्या अनेक भागात धुवाधार पावसामुळे पाणी तुंबले होते. यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. तर रेल्वेमार्गावर पाणी साचून मध्यरेल्वेचीही वाहतूक विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज स्थानकापर्यंतची रेल्वेसेवा ही बंदही करण्यात आली.