30 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणशिवसेना नाशिक महानगरपालिका स्वबळावर लढवणार

शिवसेना नाशिक महानगरपालिका स्वबळावर लढवणार

Google News Follow

Related

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना सगळ्या जागा स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे, अशी माहिती शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. शिवसेना नेते संजय राऊत पाच दिवसांच्या नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा असल्याची माहिती शिवसेनेने दिली. पुढील वर्षी नाशिक महापालिका निवडणूक होत आहे, त्यासाठी आता सर्वच पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत.

नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी सुधाकर बडगुजर यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. बडगुजर यांनी महानगरप्रमुख पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु केले.

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र ती पोकळी भरुन काढण्यासाठी शिवसेनेने सुधाकर बडगुजर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुढील नाशिक महापौर शिवसेनेचा होईल, अशी राजकीय भविष्यवाणी केल्यानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगलीच दंगल सुरु झालीय. राऊत कुठल्या जोरावर ही गोष्ट बोलताहेत हीच कल्पना विरोधकांना येत नाहीये. त्यामुळेच राऊतांच्या दाव्याविषयी तर्कवितर्क लावण्यास उधाण आलंय.

तिकडं मनसेही नाशिक मनपा निवडणुकीची कसून तयारी करतेय. भाजपनं मनसेचे अनेक नगरसेवक पळवले. त्यामुळं स्थानिक पातळीवर मनसैनिकांमध्ये भाजपबद्दल रोष आहे. मात्र, असं असलं तरी मनसेची भूमिका कृष्णकुंजवरच ठरणार आहे.

हे ही वाचा:

नाल्यातला गाळ काढण्याऐवजी महापालिकेने करातून माल काढला

महापालिकेने पाच वर्षात हजार कोटींचा घोटाळा केला म्हणून आज मुंबईची ही अवस्था झाली

महापालिकेचे दावे १२ तासांत धुवून निघाले

कोवॅक्सिन लस डेल्टा, बीटा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी

नाशिक महानगरपालिकेतील सध्याची स्थिती:
भाजपा- ६५
शिवसेना- ३५
राष्ट्रवादी- ६
काँग्रेस- ६
मनसे- ६
रिपाई- १

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा