30 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामाबार्बरा आणि मेहुल चोक्सीचे काय संबंध होते? बार्बरानेच दिली माहिती

बार्बरा आणि मेहुल चोक्सीचे काय संबंध होते? बार्बरानेच दिली माहिती

Google News Follow

Related

भारतातून फरार झालेला आणि आता डॉमनिकात पोलिसांच्या ताब्यात असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला पकडून देण्यात जिचा हात आहे, असे म्हटले जात होते, त्या बार्बरा जबारिकाने हे सगळे आरोप फेटाळले आहेत. आपण भारतातील बातम्या वाचत नाही आणि मेहुल चोक्सीची पार्श्वभूमी काय हेदेखील आपल्याला माहीत नाही. मी त्याची मैत्रीण नाही, असे तिने म्हटले आहे.

वेस्ट इंडिज बेटांवरील अँटिगात राहणारा मेहुल चोक्सी गेल्या आठवड्यात गायब झाला होता. त्यानंतर त्याला डॉमनिकात अटक करण्यात आली. त्यावरून त्याला या बार्बरा नामक महिलेने अडकवल्याचे वृत्त होते. पण आता या बार्बराने आपल्यावरील हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

ती म्हणते की, मी युरोपियन आहे. मी युरोपात राहते. मी भारतीय बातम्या वाचत नाही. मी फसवणूक करणाऱ्यांची माहिती ठेवत नाही त्यामुळे त्याचे (मेहुल चोक्सी) खरे नावही मला माहीत नाही. गेल्या आठवड्यापर्यंत मला त्याचे नाव माहीत नव्हते. मी अँटिगातील लोकांवर विश्वास ठेवते. मला असेही वाटते की, त्याचे नाव इतर कुणालाही माहीत असेल किंवा त्याची पार्श्वभूमी माहीत असेल.

हे ही वाचा:

आला रे आला…मुंबईत मुसळधार

मुळशीमधील कंपन्यांत घुसून पाहणी करु

कोव्हिशिल्डची किंमत ७८०, तर कोव्हॅक्सिन १४१० ला

मुंबईत गुन्हेगारीचा आलेख वाढला

मी त्याला ऑगस्टपासून ओळखत होते. जॉली हार्बर याठिकाणी आम्ही भेटलो होतो. तो राहात असलेल्या ठिकाणीच मी भाड्याने घर घेतले होते. त्याने मला राज या नावाने स्वतःची ओळख करून दिली. ऑगस्ट ते एप्रिल या कालावधीत तो मला मेसेज करत असे. पण या कालावधीत मी त्याला एकदाच मेसेज केला. नंतर एप्रिल-मे मध्ये आम्ही आठवड्यातून एकदा बोलत असू. एकत्र व्यवसाय करण्यासंदर्भात ही चर्चा होत असे. पण मी त्याची मैत्रीण नाही किंवा तोही माझा मित्र नाही. मी माझा व्यवसाय सांभाळते. मला पैशाची, खोट्या दागदागिन्यांची, हॉटेल बुकिंगची आवश्यकता नाही.

त्याचे अपहरण करण्याचा प्रश्नच येत नाही. जॉली हार्बर या भागाची जर कुणाला माहिती असेल तर तिथून कुणाचेही अपहरण करणे शक्य नाही. तो अगदी सुरक्षित भाग आहे. त्यामुळे त्याच्यासंदर्भात मला कुणीही संपर्क केलेला नाही. त्याने मला एकदा विचारले होते की, मी क्युबाला कधी गेले आहे का? आपण पुढच्या वेळेस क्युबाला भेटू. त्यावेळी त्याला पळून जायचे वगैरे आहे, असे त्याने सांगितले नाही. पण मला एवढी खात्री आहे की, डॉमनिका हे त्याचे अंतिम लक्ष्य असेल असे मला वाटत नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा