26 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरक्राईमनामागांधीजींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत सात वर्षांची शिक्षा

गांधीजींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत सात वर्षांची शिक्षा

Google News Follow

Related

महात्मा गांधी यांच्या पणती आणि प्रसिद्ध मानवी हक्क कार्यकर्त्या इला गांधी यांची मुलगी असलेल्या आशिष लता रामबोगिन यांना दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनच्या न्यायालयानाने आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ५६ वर्षीय आशिष लता रामबोगिन यांच्यावर एसआर महाराज या व्यापाऱ्याला ६.२ मिलियन रॅन्ड म्हणजे ३.२२ कोटी रुपयांना फसवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

आशिष लता रामबोगिन यांनी एका व्यवहाराच्या आयातीसाठी आणि सीमा शुल्कासाठी ही रक्कम देण्यात आली होती. तसेच या व्यवहारात जो काही फायदा होईल त्याचाही हिस्सा संबंधित व्यापाऱ्याला दिला नसल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

आशिष लता रामबोगिन या प्रसिद्ध मानवी हक्क इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोविंद यांच्या कन्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या फिनिक्स या आश्रमाचे पुनुरुज्जीवन करण्यामध्ये त्यांचा महत्वपूर्ण वाटा होता.

हे ही वाचा:

अखिलेश यादव ‘भाजपाची लस’ घेणार?

ठाकरे सरकारचे ₹१५०० अजून सांगलीला पोचलेच नाहीत?

ठाकरे सरकारकडून पीक विम्याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक

मोदींच्या घोषणेने ग्लोबल टेंडरची हवाच काढली

आशिष लता रामबोगिन यांच्या विरोधात २०१५ साली या खटल्याची सुरुवात झाली होती. भारतातून आफ्रिकेला येणाऱ्या काही मालावरच्या आयात आणि सीमा शुल्काची रक्कम भरायला पैसे हवे, असं सांगत आशिष लता रामबोगिन यांनी संबंधित व्यापाऱ्याकडून पैसे घेतले होते. त्यावेळी या मालासंबंधी सर्व कागपत्रेही दाखवण्यात आली होती. या व्यवहारात जो काही नफा होईल त्यामध्येही संबंधित व्यापाऱ्याला वाटा देण्याचं आशिष लता रामबोगिन यांनी कबुल केलं होतं. त्यानंतर एका महिन्यानंतर त्या व्यापाऱ्याच्या असं लक्षात आलं की, या मालाची आयात झाली आहे, त्याचे सीमा शुल्कही भरले आहे पण त्यांना त्याचे पैसे मिळाले नाहीत. मग त्या व्यापाऱ्याने आशिष लता रामबोगिन  यांच्या विरोधात खटला दाखल केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा