देशात सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेने आता पालिकेच्या शाळांना डिजिटल करण्याचा विडा उचलला आहे. एकीकडे लॉकडाउनमुळे आणि कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शाळांना टाळे असले तरी महापालिकेने मात्र पालिका शाळांतील मुलांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी खर्चाची तयारी केली आहे. महापालिका शाळातील काळे फळे आता गायब होणार आहेत. त्याजागी आता डिजिटल फळे येणार आहेत. हे फळे नेमके कधी वापरले जाणार आहेत हे ठाऊक नसले तरी त्यासाठी खर्चाची तजवीज पालिकेने केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकांच्या शाळांमधून आता नेहमीचा काळा फळा गायब होण्याची वेळ आलेली आहे. स्थायी समितीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला असून त्यासाठी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारचे ₹१५०० अजून सांगलीला पोचलेच नाहीत?
बापरे ! म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला खर्च आला दीड कोटी
ठाकरे सरकारकडून पीक विम्याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक
२० जुलैला जेफ बेझोस अंतराळात झेप घेणार
महापालिकेने आता कंत्राटदार नेमून डिजिटल फळा बसवण्याचा घाट घातलेला आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार ३०० वर्ग डिजिटल करण्यात येणार आहेत. याकरता ३६ कोटी ७९ लाख रुपयांचा खर्च पालिका करणार आहे. असा प्रस्तावही महापालिका स्थायी समितीकडे सादर झाला आहे.
कंत्राट मिळाल्यानंतर सहा महिन्यांमध्ये १३०० वर्ग डिजिटल करणे हे कंत्राटदाराला बंधनकारक असणार आहे. तसेच हे फळे किमान पाच वर्षे टिकायला हवेत, अशीही अट यामध्ये घालण्यात आलेली आहे. शिक्षकांना यापुढे खडूच्या पावडरचा त्रास होऊ नये याचाही विचार हे वर्ग डिजिटल करण्यामागे आहे.
महापालिकेच्या या कंत्राटातून या शाळा किती डिजिटल होतात आणि त्याआधी शाळा केव्हा सुरू होतात, हे पाहावे लागेल.