गेल्याच आठवड्यात परळ येथील हाफकीन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडने कोवाक्सिन तयार करण्यासाठी हैदराबादच्या भारत बायोटेकबरोबर सामंजस्य करार केला. येत्या आठ ते दहा महिन्यांमध्ये हाफकिनकडून लस पुरवण्याची सुरुवात होईल. लसींच्या उत्पादनासाठी किती काळ नेमका जातो, याचा अंदाज आता येणार आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नानंतर २३ कोटी लोकांचे लसीकरण झालेले आहे. पण भारतातला लसीकरणाचा वेग कमी आहे, अशी टीका करणाऱ्यांना आता लसींचे उत्पादन करण्यासाठी किती काळ प्रतीक्षा करावी लागते हे स्पष्ट होणार आहे. हाफकिनमध्येही आठ महिन्यांनी उत्पादन सुरू होणार आहे. त्यामुळे आणखी वर्षभर वाट पाहावी लागेल.
वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे सचिव सौरभ विजय म्हणाले की, लस उत्पादन प्रक्रियेतील तंत्रज्ञान हस्तांतरण आणि इतर अनेक चरणांसाठी सामंजस्य करार मंजूर केला. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने गेल्या आठवड्यात सांगितले होते की तंत्रज्ञान हस्तांतरणाची कामे सुरू केली गेली आहेत ज्यामुळे हेफकीन बायोफर्मा एका वर्षात कोव्हॅक्सिनच्या २२.८कोटी डोसची निर्मिती करू शकेल. आम्ही आठ महिन्यांत उत्पादन सुरू करण्याची अपेक्षा करतो अशी माहितीही हाफकिनकडून देण्यात आली होती. तसेच परळ येथे बायोसेफ्टी लेव्हलच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येईल असेही यावेळी विजय यांनी मत व्यक्त केले.
हे ही वाचा:
हयात रिजन्सी हॉटेल पैशांअभावी बंद
कॉंग्रेसच्या आर्थिक उत्पनाचा आलेखही अधोगतीकडे
मोदींच्या घोषणेने ग्लोबल टेंडरची हवाच काढली
केमिकल कंपनीत काल आग, तर आज गोडाऊनने पेट घेतला
माटुंगा येथे मजबूत तांत्रिक संघ तयार करण्यासाठी हफकीन आयआयटी-बॉम्बे, टीआयएफआर आणि आयसीटीचीही मदत घेत आहे. हाफकीनला केंद्राकडून ६५ कोटी आणि कोवाक्सिन उत्पादनासाठी राज्य सरकारने ९४ कोटी रुपये अनुदान दिले आहे. विजय म्हणाले की, काही चमू या लसनिर्मिती प्रशिक्षणासाठी हैदराबादला जाणार आहेत, तर हैदराबाद व जैवतंत्रज्ञान विभागातील तज्ज्ञदेखील मुंबईत दाखल होणार आहेत.
हाफकिन ही बायोफार्मास्युटिकल कंपनी १२२ वर्षांची असून, देशातील सर्वात जुन्या बायोमेडिकल संशोधन संस्थांपैकी एक आहे. जुलै ते ऑगस्ट २०२१ पर्यंत स्वदेशी विकसित कोवाक्सिन लसीची सध्याची उत्पादन क्षमता जवळपास सहापट वाढविण्यात येईल, असेही केंद्राने म्हटले आहे.