27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामामुंबई पोलिसांच्या वाहनाच्या ताफ्यात 'एटीव्ही'

मुंबई पोलिसांच्या वाहनाच्या ताफ्यात ‘एटीव्ही’

Google News Follow

Related

मुंबई पोलिसांकडे असलेल्या वाहनांच्या ताफ्यात नवीन वाहनाचा समावेश झाला आहे. ऑल टेरियन व्हेइकल्स (एटीव्ही) या वाहनाचा समावेश असणार असून हे वाहने समुद्र किनाराऱ्यावर गस्त घालण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुंबईचे पालक मंत्री यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटी हा उदघाटन सोहळा पार पडला असून मुंबई पोलिसांना रिलायंस फाउंडेशनच्या वतीने ही १० वाहने मुंबई पोलिसांना सुपूर्द करण्यात आली आहे.

ऑल टेरियन व्हेईकल्सचा उपयोग मुंबई शहरातील समुद्रकिनारा गस्त करण्यासाठी केला जाईल. पेट्रोल इंजिनवर चालणारे एटीव्ही या वाहनाचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर असेल. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर रिलायन्स फाउंडेशनने एटीव्ही मुंबई पोलिसांना सुपूर्द केल्या आहेत.

हे ही वाचा:
राज्यांच्या अपयशावर उतारा; सर्वांना मोफत लसीची मोदींची घोषणा

खलिस्तान्यांना शहिद म्हणत भज्जीची हिट विकेट

सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राची लसीकरणाच्या नासाडीत आघाडी

‘लसीकरणाचे विकेंद्रीकरण करा, म्हणणाऱ्यांना केंद्रावरच विश्वास ठेवावा लागला’

सोमवारी गिरगाव चौपाटी येथे झालेल्या या उदघाटन सोहळ्यास उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पर्यटन व पर्यावरण मंत्री, मुंबई शहराचे पालकमंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त मुंबई, महापौर मुंबई, रिलायन्स फाउंडेशनचे प्रशासन प्रमुख, इतर मान्यवर उपस्थित होते.

मुंबई पोलिसांच्या वाहनांच्या ताफ्यात यापूर्वी समुद्र किनारी गस्त घालण्यासाठी या अनेक वाहने आली होती. मात्र या वाहनाचे पुढे काय झाले याबाबत काहीही कळू शकलेले नाही. पेट्रोल वर चालणारी ही ऑल टेरियन व्हेयिकल मुंबई पोलीस दलात किती महिने किती वर्षे तग धरतील याबाबत मात्र सांगता येणार नाही.

वर्षभरापूर्वी सेगवे मुंबई पोलिसाना देण्यात आले होते, या सेगवेचा वापर गिरगाव चौपाटीवर गस्त करण्यासाठी करण्यात येत होता, काही आठवडे सेगवे दिसून आली मात्र आता ते सुद्धा दिसून येत नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा