महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऐतिहासिक घटना, तारखा आणि संदर्भ यांच्या केलेल्या घोळामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. हीच संधी साधून भारतीय जनता पार्टी मुंबईने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. वेळ मारून नेणाऱ्यांचे तोंडावर आपटणे नेहमीचेच असे म्हणत भाजपा मुंबईने मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
दैनिक लोकसत्ता आयोजित दृष्टी आणि कोन या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऐतिहासिक घटनांची फारच सरमिसळ केलेली दिसली. भारतात १०० वर्षांपूर्वी आला होता असे सांगताना दुसऱ्या महायुद्धात वाचलेले सैनिक हे स्पॅनिश फ्लू ने गेले असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. वास्तविक या दोन्ही घटना वेगवेगळ्या काळातल्या आहेत. भारतात आलेला स्पॅनिश फ्लू हा १९१८ साली आला होता. त्यावेळी पहिले महायुद्ध संपले होते. तर दुसरे महायुद्ध हे वास्तविक १९३९ ते १९४५ या कालखंडात लढले गेले. पण या दोन्ही घटनांची सरमिसळ करून मुख्यमंत्र्यांनी केलेली मांडणी ही दर्शकांमध्ये खसखस पिकवून गेली.
हे ही वाचा:
चित्रिकरणासाठी निर्बंध उठले परंतु प्रश्नचिन्ह कायम
भारत, अमेरिका, चीनला मिळाल्या ६० टक्के लसमात्रा
पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघातच झाडांची कत्तल
महाराष्ट्रात कोरोना मृतांची संख्या १ लाखांच्या पुढे
मुख्यमंत्र्यांच्या मांडणी नंतर सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली जात असून यातच आता मुंबई भाजपानेही वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले आहेत. मुंबई भाजपाने ट्विट करत असे म्हटले आहे की, “इतिहास नव्याने लिहिण्याच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पॅनिश फ्लू आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळाची गल्लत केली. दोन्ही घटनांमध्ये दोन दशकांहून अधिक वर्षांचे अंतर असूनही त्यांनी या घटना एकाच काळातल्या ठरवल्या. वेळ मारून नेणाऱ्यांचं तोंडावर आपटणं नेहमीचंच.”
इतिहास नव्याने लिहिण्याच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी स्पॅनिश फ्लू आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळाची गल्लत केली. दोन्ही घटनांमध्ये दोन दशकांहून अधिक वर्षांचे अंतर असूनही त्यांनी या घटना एकाच काळातल्या ठरवल्या. वेळ मारून नेणाऱ्यांचं तोंडावर आपटणं नेहमीचंच. pic.twitter.com/Cqb431195X
— BJP MUMBAI (@bjp4mumbai) June 6, 2021