डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसवरून चीनला पुन्हा एकदा फटकारले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबद्दल चीनला जबाबदार धरलेय. वुहान लॅब थिअरीवरील जागतिक चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी एक विधान जारी केले. ते म्हणाले आहेत की, ‘प्रत्येक जण, अगदी तथाकथित शत्रूलादेखील असा विश्वास आहे की अध्यक्ष ट्रम्प यांचे म्हणणे बरोबर आहे. वुहान प्रयोगशाळेपासून चिनी विषाणूचा उद्भव झाला. अमेरिका आणि जगभरात झालेल्या विनाश आणि मृत्यूमुळे चीनने १० ट्रिलियन डॉलर्स भरपाई द्यावी, असंही त्यांनी सांगितलंय.
डोनाल्ड ट्रम्प अनेकदा कोरोना विषाणूला चिनी व्हायरस आणि वुहान व्हायरस म्हणून संबोधतात. ज्यावर चीनने तीव्र आक्षेप नोंदविला होता, तसेच त्यांना वर्णद्वेषीही म्हटले होते. जागतिक आरोग्य संघटनेची टीम देखील वुहान विषाणूच्या उत्पत्तीची तपासणी करण्यासाठी पोहोचली, जिथे या पथकाने साथीच्या संबंधित गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अहवालात या संघटनेने म्हटले आहे की, वुहान लॅबमधून विषाणूचा उद्भव झाला हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. जोपर्यंत ही टीम चीनमध्ये होती, तोपर्यंत तेथील अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले.
तपासात डब्ल्यूएचओ टीमला पूर्णपणे सहकार्य न केल्याचा आणि वुहान लॅबशी संबंधित माहिती लपवून ठेवल्याचा चीनवर आरोप होता. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालात असा दावाही करण्यात आला होता की, नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याच प्रयोगशाळेतून तीन जणांना कोविडसारखी लक्षणे दिसली होती. चीनने हा अहवाल खोटा असल्याचे म्हटले होते. कोणत्याही प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना संसर्ग झालेला नाही. हा अहवाल समोर आल्यानंतर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या विषाणूच्या उत्पत्तीची चौकशी करून ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.
हे ही वाचा:
रा.स्व. संघाच्या अनेक नेत्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ट्विटरचा वार
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडूंच्या अकाउंटवरील ‘ब्लू टीक’ ट्विटरने काढली
बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार
महिलांना पुन्हा एकदा लोकल प्रवासाची मुभा
अमेरिकेच्या प्रसिद्ध संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फॉची यांचे काही वैयक्तिक मेलही समोर आलेत. डॉ. फॉसी यांना यू. एस. बायोमेडिकल रिसर्च टीमच्या संचालकाकडे पाठविण्यात आले होते. जानेवारी २०२० मध्ये पाठविलेल्या या मेलमध्ये असे म्हटले होते की, या विषाणूमध्ये काहीतरी असामान्य आहे. हा विषाणू तयार करण्यात आला आहे. उत्तरादाखल डॉक्टरांनी त्यांना फोनवर बोलण्यास सांगितले. त्यांनी असेही म्हटले आहे की, व्हायरस नैसर्गिकरित्या जन्मला आहे, याची आपल्याला खात्री नाही, याची गंभीरपणे चौकशी झाली पाहिजे.