“बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार,” असा निर्धार शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा निघणार आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
विनायक मेटे यांनी नुकतंच नारायणगडाचं दर्शन घेतलं आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारला सद्बुद्धी देण्याचं साकडं घातलं आहे. बीडमध्ये मराठा मोर्चा निघणार आहे. कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला तरी मोर्चा हा निघणार आहे. तसेच हा मोर्चा यशस्वी करु. सध्या बीडमध्ये कार्यकर्ते यायला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी पोलिसांचं काम करावं, मात्र कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असा इशारा विनायक मेटेंनी दिला आहे.
बीडमध्ये निघणाऱ्या या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी पोलिसांचा कड़ेकोट बंदोबस्त असणार आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच बीडमध्ये एसरपीएफच्या एका तुकडीसह ५३१ पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर शेकडो पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बीडमधील छत्रपती शिवाजी स्टेडियमवरून मराठा क्रांती संघर्ष मोर्चा निघणार आहे.
मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी ३ डीवायएसपी, ११ पीआय, २८ पीएसआय, ९६ महिला पोलिसांसह ३०६ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय एसरपीएफच्या तुकडीसह जवळपास ६०० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच एसरपीएफची एक तुकडीही बीड शहरात तैनात करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
महिलांना पुन्हा एकदा लोकल प्रवासाची मुभा
राज्याचा प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो
‘आम्ही भजन करण्यासाठी पक्ष चालवत नाही’
एकीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी कोरोनाच्या काळात मोर्चे काढू नका, अशी भूमिका घेतली असताना विनायक मेटे मोर्चा काढण्यावर ठाम होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन मोर्चाला परवानगी मिळावी म्हणून निवेदन सादर केले होते. सदरचा मोर्चा मराठा क्रांती मोर्चांच्या प्रथेप्रमाणे शांततेत व शिस्तीत, कायदा व सुव्यवस्थेला कुठलीही बाधा येऊ न देता काढला जाईल. त्याचप्रमाणे करोना महामारीच्या काळातील आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून, सोशल डिस्टनसिंग पाळून हा मोर्चा काढला जाईल याची खात्री असावी, असे या निवेदनात म्हटले होते. मात्र, त्यानंतरही पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाकरण्यात आली होती.