आम्ही राजकारणात पक्ष चालवतो तो भजन स्पर्धेकरता चालवत नाही. आमचा विकासाचा अजेंडा आहे. तो राबविण्यासाठी सरकारमध्ये यावं लागेल. विकासासाठी यावे लागेल. मी पाच वर्षे मुख्यमंत्री होतो. त्यातील पहिले वर्ष सोडले तर बाकी चारही वर्षे आम्ही गुजरातच्या पुढे गेलो. तीन प्रमुख राज्यांपेक्षा अधिक गुंतवणूक झाली महाराष्ट्रात. आताच्या या सरकारमुळे गुजरात १० टक्के महाराष्ट्रापुढे गेले. कुणी त्यावर प्रश्न विचारत नाहीत. माझे स्पष्ट मत आहेत, मला वाटतं की तुम्ही (प्रसारमाध्यमांनी) या सरकारला खूप ढिल दिली आहे. तुम्ही ठरवलंय की सरकार चाललं पाहिजे आणि ती जबाबदारी आपलीच आहे. जेवढे बारकाईने तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवायचात त्याच्या ५ टक्केही आताच्या सरकारवर तुमचे लक्ष नाही, अशा शब्दांत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताच्या दृष्टि आणि कोन या कार्यक्रमात मुलाखतकार गिरीश कुबेर यांच्या प्रश्नांच्या पार चिंध्या उडविल्या.
फडणवीस म्हणाले की, लोकसत्ता किंवा एक्स्प्रेस ग्रुपने नेहमीच प्रस्थापितांविरोधात भूमिका घेतली आहे. पण आता लोकसत्ता हातात धरला तर कुठेतरी शंका येते की, प्रस्थापितांविरोधातली भूमिका त्यांनी सोडून दिली आहे की काय? वृत्तपत्रे सरकार पाडू शकत नाहीत किंवा स्थापन करू शकत नाही, हे मान्य. पण आमची जेवढी बारकाईने तपासणी माध्यमे करायची, तेवढी या सरकारची होत नाही.
हे ही वाचा:
कोरोना आजार नाही,अल्लाहची माफी मागून होईल सुटका! सपा खासदाराची मुक्ताफळे
…आणि मोसाद स्टाइल चोक्सी झाला जेरबंद!
मोदींच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली कोरोनाची दुसरी लाट आली आटोक्यात
आमदार देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यातील फरक सांगताना फडणवीस म्हणाले की, देवेंद्र फडणवीसमध्ये एक गोष्ट दिसेल जी भूमिका असेल त्याला १०० टक्के न्याय देतो. विरोधी पक्ष नेता फडणवीस सरकारशी समझोता करणार नाही. एकही स्टेटमेंट माझे सरकारविरोधात नाही. विरोधासाठी विरोध नाही. सक्षम विरोधी नेता म्हणून सरकारला विरोध करायचा नाही का?
मे महिन्यात महाराष्ट्रात २६ हजार मृत्यू झाले तरीही पीआर करून सांगितले जाते आहे. मुंबई पॅटर्नचे कौतुक होते आहे, आकडेवारी दिली जाते. २६ हजार महाराष्ट्रात झाले. मुंबईत ४० टक्के मृत्यू झाले. आकडे धडधडीत लपविले जात आहेत. याविरोधात जर बोललो तर मी सत्तेसाठी करतो आहे असे म्हटले जाते, ते कसे काय? मी जनतेला उत्तरदायी आहे. मी प्रत्येक माणसापर्यंत जातोय. शेतकऱ्यांपर्यंत जातोय. कोरोनापीडितांपर्यंत जातोय. विरोधी पक्षाचे काम सरकारपर्यंत त्यांच्या कामातील त्रुटी पोहोचविणे आहे.
खोट्या बातम्या पेरणारी इको सिस्टीम
तरीही पंतप्रधान महाराष्ट्राचे कौतुक का करतात यावर फडणवीस उसळून म्हणाले की, पंतप्रधानांचे कौतुक तुम्ही ऐकले का, कुणीतरी ऐकले का, एक क्लिप दाखवा मला. हीच मजेची गोष्ट आहे. रोज सकाळी एक खोटी बातमी सोडायची, दिशाभूल करण्याची. इको सिस्टीमने पसरवायची. पंतप्रधान असे बोलू शकतात, तुम्ही एखादे काम चांगले केले आहे. २३ टक्के मृत्यू आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक अव्यवस्था असताना, मृत्यू होत असताना, केंद्राकडे बोट दाखवायचं. आणि नंतर तारीफ होते अशा वावड्या उठवायच्या. आंतरराष्ट्रीय माध्यमांत काय छापून आले, त्याचे स्रोत काय आहे हे आम्हालाही कळते. जर तुम्ही कामाचे श्रेय घेत असाल तर देशातील सर्वाधिक मृत्यूचे अपश्रेयही घ्यावे लागेल.