फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एक संशयित दहशतवादी हल्ला उधळून लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलंय. पॅरिस विमानतळावर सुरक्षारक्षांना एका विमानात संशयित स्फोटकं आढळल्यानंतर हा कट उघड झाला. हे विमान आफ्रिकेतील चार या देशातून आलं होतं. फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डारमॅनिन यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (३ जून) पंतप्रधानांच्या निर्देशानुसार क्रायसिस युनिटने एअर फ्रान्सच्या विमानातून संशयित स्फोटक यंत्र बाजूला काढलं.
गृहमंत्री गेराल्ड म्हणाले, “विमानाला रोएसी चार्ल्स डि गुआले विमानतळावर कोणत्याही अडचणीशिवाय सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आलं. या विमानाला पूर्णपणे वेगळं करण्यात आलंय. तसेच संशयित बॉम्बच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी फ्रान्स सरकारने तात्काळ क्रायसिस टीमची स्थापना केलीय. यात सरकारचे प्रतिनिधी म्हणून काही मंत्र्यांचाही समावेश आहे. यात यूरोप आणि परराष्ट्र खात्याचे मंत्री, संरक्षण मंत्री आणि परिवहन मंत्र्यांचाही समावेश आहे.”
हे ही वाचा:
कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट
तुमचे मंत्री सत्तेसाठी लाचार, काका-पुतण्यांपुढे माना डोलावत
मीरा चोप्रा प्रमाणेच इतर २१ जणांचे नियमबाह्य लसीकरण
अपरिपक्वता की श्रेयवाद? फडणवीसांचा सवाल
फ्रान्समध्ये मागील काही दिवसांपूर्वीच एका इस्लामिक कट्टरतावादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पाळतीखाली असलेल्या व्यक्तीने पोलिसांवर हल्ला केला होता. तो सित्जोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचंही सांगण्यात आलं. त्याने एका पोलीस स्टेशनमध्ये घूसून दोन अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या आणि एकावर चाकू हल्ला केला होता.