लॉक अनलॉकच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या आघाडी सरकारचा सरकारी गोंधळ सुरु आहे. यावरूनच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची चांगलीच फिरकी घेतली आहे. ट्विटरच्या माध्यमातून फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये काही प्रश्न विचारत त्यांनी सरकारच्या सावळा गोंधळ जनतेसमोर मांडला आहे.
महाराष्ट्र्राच्या ठाकरे सरकारमधील विसंवाद गुरुवारी चाव्हाट्यावर आला आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक होणार असल्याची घोषणा गुरुवारी संध्याकाळी केली. या घोषणेनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. पण हा त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. अजून राज्यातील कडक निर्बंध हटवले गेले नसून नव्या नियमांचा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे असे स्पष्टीकरण महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आल्यानंतर नागरिकांची निराशा झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यात पाच टप्प्यांत अनलॉक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. राज्य सरकारच्या या घुमजावमुळे सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.
हे ही वाचा:
बॉलीवूडमधील ४४ पेक्षा कमी वयोगटासाठी पालिकेने आधीच उघडली होती लशीची दारे
अटी-शर्तींसह का असेना पण पुन्हा चित्रिकरणाला परवानगी द्या
शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही
राज्यात अद्याप अनलॉक नाहीच, पण सरकारमधील विसंवाद चव्हाट्यावर
सरकारच्या याच कारभारावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला चिमटा कढला आहे. काय सुरू, काय बंद? कुठे आणि केव्हापर्यंत? लॉक की अनलॉक? पत्रपरिषद की प्रेसरिलीज? अपरिपक्वता की श्रेयवाद? असे प्रश्न फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरून विचारले आहेत. फडणवीसांचे हे प्रश्न म्हणजे महाराष्ट्र सरकारचा सावळा गोंधळच त्यांनी शब्दांतून मांडला आहे.
काय सुरू, काय बंद ❓
कुठे आणि केव्हापर्यंत❓
लॉक की अनलॉक❓
पत्रपरिषद की प्रेसरिलीज❓
अपरिपक्वता की श्रेयवाद❓#Lock #Unlock pic.twitter.com/bZF1AEx9yY— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 3, 2021