24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेष'अवकाशक्षेत्रात' भारताची अवकाश भरारी

‘अवकाशक्षेत्रात’ भारताची अवकाश भरारी

Google News Follow

Related

देशात सध्या कोरोना महामारीमुळे चिंतेचे सावट असताना अवकाश क्षेत्राबाबत भारताची दमदार कामगिरी समोर आली आहे. देशात सुमारे ३५० पेक्षा अधिक अवकाश क्षेत्रातील कंपन्या असल्याचे समोर आले असून, खासगी क्षेत्रातील अवकाश कंपन्यांच्या शर्यतीत भारताने चीन, रशिया आणि जपानला मात देत जगात पाचवे स्थान पटकावले आहे.

अवकाशक्षेत्राचा आकार जागतिक स्तरावर २०२५ पर्यंत सुमारे ५०० ट्रिलीयन डॉलर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या क्षेत्रातील खासगी कंपन्यांचा सहभाग मोजण्यात आला. त्यासाठी जगभरातून सुमारे १०,००० विविध कंपन्यांचा आढावा घेण्यात आला. यापैकी ५,५०० कंपन्या अमेरिकेतील होत्या तर ६१५ कंपन्यांस ब्रिटनने दुसरा क्रमांक पटकवला. त्यानंतर कॅनडा, जर्मनी आणि भारताचा क्रमांक लागला होता. या अहवालात भारतातील ३६८ कंपन्यांनी स्थान पटकावले.

हे ही वाचा:

सीरम इन्स्टिट्यूट करणार स्पुतनिक व्ही चे उत्पादन?

शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही

दिल्लीच्या मशिदीत अल्पवयीन मुलीचा बलात्कार, मौलवीला अटक

पुलवाम्यात भाजपा नेत्याची दहशतवाद्यांकडून हत्या

याबाबत इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्याबरोबर इन-स्पेस सोबतच्या निविदांमध्ये देखील २०२० पेक्षा ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले आहे.

या शर्यतीत भारताने अनेक मोठ्य देशांना देखील मात दिली आहे. चीन, फ्रान्स आणि स्पेनमध्ये अनुक्रमे २८८, २६९ आणि २०६ कंपन्यांचा क्रमांक लागला आहे, तर जपानमधील १८४ आणि रशियात केवळ ५४ कंपन्यांची नोंद घेतली गेली.

अवकाशक्षेत्रातील या कंपन्यांपैकी अनेक कंपन्या नकाशाशास्त्र आणि नेव्हिगेशन क्षेत्रात आहेत. या कंपन्यांची संख्या २,८२० इतकी आहे. तर जगातील सुमारे १,००० कंपन्या उत्पादन क्षेत्रातील आहेत. त्याव्यतिरिक्त रिमोट सेन्सिंग, अवकाश पर्यटन इत्यादी विविध क्षेत्रांतही अनेक वेगवेगळ्या कंपन्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा