27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामासुशांत सिंह राजपूत प्रकरण, ड्रग पेडलर हरीश खानला अटक

सुशांत सिंह राजपूत प्रकरण, ड्रग पेडलर हरीश खानला अटक

Google News Follow

Related

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या हाती त्याच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर लागला आहे. हरीश खान असं त्याचं नाव असून एनसीबीने वांद्रेमधून त्याला अटक केली आहे. हरीशसोबत त्याचा भाऊ शाकिब खानला सुद्धा अटक केली आहे. शाकिबवर १९ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. शाकीबला एनसीबीने वांद्रे पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे.

मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २८ मे रोजी सुशांत सिंह राजपूतचा रूम पार्टनर आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पीठानीला हैदराबादमधून अटक केली होती. एनसीबीने नीरज आणि केशव जे सुशांतचे नोकर होते त्यांची सुद्धा कसून चौकशी केली. या चौकशीनंतर हरीश खान याचं नाव समोर आलं. हरीश खान तोच ड्रग पेडलर आहे ज्याच्याकडून सुशांत सिंहपर्यंत ड्रग्ज पोहचवले जात होते.

हरीश त्याच्या भाऊ शकीब खान सोबत वांद्रे परिसरात ड्रग्सचा व्यापार करत होता.  हारीश खानला दाऊद बनायचं होतं, दाऊद त्याचा प्रेरणास्त्रोत असून त्याला मुंबईवर दाऊदसारखं अधिराज्य गाजवायचं होतं. आपली दहशत कायम ठेवण्यासाठी हरीश खान वांद्रे परिसरातील छोट्या ड्रग पेडलरच अपहरण करायचा आणि त्यांच्याकडे असलेलं ड्रग्स जप्त करुन त्यांना आपल्या टोळीमध्ये काम करण्यास भाग पाडायचा. लोकांमध्ये आपली दहशत निर्माण करण्यासाठी हरीश खान कधी बंदूक घेऊन फिरायचा तर कधी जिवंत साप घेऊन.

एनसीबीचा तपास युद्धपातळीवर सुरु असून लवकरच यात अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे, सिद्धार्थ पीठानी, नीरज, केशव एनसीबी पासून वाचण्याचा प्रयत्न करत होते. सिद्धार्थ पीठानीला तीन वेळा समन्स बजावून सुद्धा तो चौकशीसाठी हजर झाला नव्हता. त्यानंतर एनसीबीने सिद्धार्थ वर पाळत ठेवून त्याला हैदराबाद मधून अटक केली.

हे ही वाचा:

आता कोरोनामुळे मृत झालेल्यांना ४८ तासांत मिळणार ५० लाख

आता एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

‘सीएसएमटी’चा कायापालट लवकरच

आम्हाला कोरोनाच्या जबाबदारीतून मुक्त करा

सिद्धार्थच्या अटकेनंतर एनसीबीने नीरज आणि केशव या दोघांची चौकशी सुरू केली आणि या प्रकरणी नवे खुलासे होऊ लागले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा