‘मुंबई सागा’ या हिंदी चित्रपटाच्या लेखक दिग्दर्शक आणि निर्मात्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मुंबई येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या महेश भिंगार्डे यांनी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक संजय गुप्ता आणि सर्व निर्मात्यांच्या नावे ही नोटीस पाठवली आहे.
मुंबई सागा नावाचा एक हिंदी चित्रपट १९ मार्च रोजी ‘ॲमेझॉन प्राईम’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. जॉन इब्राहिम आणि इमरान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मुंबईमधील गुन्हेगारी विश्वावर आधारित आहे. या चित्रपटातील एका दृश्यात विनाकारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेची बदनामी करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
हे ही वाचा:
मीरा चोप्रा लसीकरण प्रकरण, कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची भाजपाची मागणी
यांना समाज बांधवांची काळजी की पराभवाची भीती?
तुम्हीच आमचे माय बाप…अजूनही जनतेला फडणवीसांकडूनच अपेक्षा
या चित्रपटातील एका दृश्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील व्यक्तींचा फोटो दाखवत त्यातील व्यक्ती एका सेनेचे सदस्य असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही सेना भाऊ नावाच्या एका व्यक्तीशी संबंधित असल्याचे दाखवले आहे. तर या सेनेतील व्यक्ती मुंबई पोलिस दलात घुसखोरी करून महत्त्वाची पदे काबीज करत आहेत आणि मुंबई पोलिस दलातच भाऊची स्वतंत्र सेना तयार होऊ लागली आहे अशा आशयाचे संवाद या दृश्यात दाखवण्यात आले आहेत.
या दृश्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश दाखवल्यामुळे संघाबद्दल गैरसमज पसरवून प्रतिमा मलीन केली जात आहे असा आरोप मुंबईतील संघ स्वयंसेवक भिंगार्डे यांनी आहे. तर ह्या दृश्यामुळे संघ स्वयंसेवकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचेही भिंगार्डे यांचे म्हणणे आहे. त्यानुसारच भिंगार्डे यांनी या चित्रपटाच्या चमूला कायदेशीर नोटीस बजावण्यात आहे. चित्रपटातून ही बदनामीकारक दृश्ये आणि सर्व संवाद काढून टाकावेत, तसेच वृत्तवाहिन्यांवरून जाहीर माफी मागावी अन्यथा आपण कायदेशीर कारवाई करू असे या नोटिसीत म्हटले आहे. ‘लॉ मराठी’ या पोर्टलने या संबंधीचे वृत्त दिले आहे.
प्रचार माध्यमांनी ह्या व्यक्तीनी रुग्णालयात नासधुस व हाणामारी झाल्या संदर्भात पण बातम्या द्याव्या.
डाॅक्टर व इतर सेवकांना मारहाण करण्याचि व नुकसान करण्याचि मानसिक विक्रुती जडली आहे.
याचि कारणमीमांसा होत नाही उलट राजकारणी प्रोत्साहन देतात का?