भारतीय हवामान खात्याने सुधारित मान्सुनचा अंदाज व्यक्त केला असून २०२१ सालच्या या हंगामात १०१ टक्के पावसाची सरासरी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच प्रशांत महासागरात या दरम्यान स्थिती स्थिर राहणार असून आयओडी म्हणजे इंडियन ओशियन डायपोल निगेटिव्ह राहणार आहे. भारतीय हवामान खात्याने एका वर्च्युअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिली.
गेल्या एप्रिलमध्ये हवामान खात्याने मान्सुनचा पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यामध्ये ९८ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता या बाबत सुधारित अंदाज व्यक्त केला असून तो सरासरीच्या १०१ टक्के असेल असं सांगण्यात येतंय. प्रशांत महासागरात ला-लिना स्थिती तयार झाल्याने त्याचा फायदा नैऋत्य मान्सुनला होणार आहे. त्यामुळे मान्सुनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या आधी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता सुधारित अंदाजानुसार, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केरळात मान्सून उशीरा दाखल होणार असल्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. कोकणातही आता दोन दिवस उशिरा मान्सूनचं आगमन होणार आहे.
सध्या केरळमध्ये आम्रसरी कोसळत आहेत. त्यामुळे किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागावर पावसाळा सुरु होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता विभागाने व्यक्त केली होती.
हे ही वाचा:
मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव
ठाकरे सरकारच्या बेपर्वाईने, ओबीसींचा राजकीय हक्क डावलला जाणार
चीनमध्ये आता अपत्ये तीन, लेकुरे उदंड होणार
काँग्रेस नेत्याची आता थेट भोसले राजघराण्याकडून वसूली
भारतासाठी नैऋत्य मान्सुनचा पाऊस हा अत्यंत महत्वाचा असतो. या मान्सुनच्या पावसावरच खरीप हंगामातील पिकांची पेरणी अबलंबून असल्याने भारतीय शेतीवर मान्सुनचा मोठा परिणाम होतो.