राज्यात आजपासून अनेक निर्बंध शिथील करण्याता आले आहेत. परंतु अजूनही सलून, व्यायामशाळा आणि उद्याने मात्र बंदच राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारने नवीन नियमावली लागू केलेली आहे. या नियमावली अंतर्गत सलून, स्पावरील बंदी कायम असणार आहे. तसेच व्यायामशाळा उद्याने देखील १५ जूनपर्यंत बंदच राहणार आहेत.
सरकारने राज्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यामुळे व्यापारीवर्गाला आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. काही निकषांच्या आधारे हे निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला म्हणजेच पालिका आयुक्त किं वा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
मुंबई महापालिका निवडणुका होणार! निवडणूक आयोगाचा हिरवा कंदिल
भारताने फटकारल्यानंतर डब्ल्यूएचओने कोरोना उपप्रकाराचे नाव बदलले
शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांचा कारावास
झुंबड गोळा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई कधी?
सध्याच्या आरोग्य विभागाच्या २६ मेच्या अहवालानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील बाधितांचे प्रमाण २१.३६ टक्के आहे. त्यामुळे तेथे प्रवासावर निर्बंध घालण्यात येणार आहेत.
राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी सलून आणि स्पा, व्यायामशाळा, उद्यान यावरील निर्बंध कायम राहतील असेही सरकारने स्पष्ट केलेले आहे. तसेच जीआरई, जीएमएटी, टीओईएफएल, आयईएलटीएस या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना घरातील एका सज्ञान व्यक्तीसोबत हॉल तिकीट किंवा इतर कोणत्याही दस्तावेजाच्या आधारे प्रवास अथवा ये-जा करता येणार आहे.