चित्रपट सृष्टीमध्ये इतर अनेक घटकांसोबत चित्रपटगृह ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. आता कोरोना काळात बहुतांश प्रेक्षकांचा ओढा हा नवीन अशा ओटीटी माध्यम्याकडे वाढला असला तरी मोठ्या पडद्यावर सिनेमा बघायची मजा वेगळी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज या चित्रपटगृहांचे आणि खास करून सिंगल स्क्रिन चित्रपटगृहांचे भवितव्य हे धोक्यात आले आहे. एक काळ होता की या सिंगल स्क्रीन थिएटरमधे मोठमोठ्या चित्रपटांचे प्रीमियर झालेले आहेत. पण या सिंगल स्क्रीनचा असलेला हा थाट काळानुसार कमी का होत गेला यासाठी बरीच कारणं आहेत. याबद्दलच बोलतायत नितीन दातार.