गेल्या काही दिवसांत भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. मध्यंतरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितीन गडकरींवर स्तुतीसुमने उधळली होती आता त्यांच्या पंक्तीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण जाऊन बसले आहेत.
नितिन गडकरी आमचे आवडते मंत्री आहेत, परंतु ते चुकीच्या पक्षात असल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी देखील नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुकीत पराभूत करणे शक्य नाही तर निदान या मार्गाने मोदींविरोधात भाजपामधील नेत्यालाच उभे करण्याची क्लृप्ती लढविण्याची वेळ काँग्रेस नेत्यांवर आली आहे.
हे ही वाचा:
दोन दिवसांत ठरणार सीबीएसई, आयसीएसई बारावीच्या परिक्षांचे भवितव्य
पंजाबमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर?
मेट्रोचा बट्याबोळ करूनही मुख्यमंत्र्यांकडून ट्रायल रनची नौटंकी
मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे नव्या थापा, नव्या बाता
केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्याबद्दल अनेक चांगले शब्द बोलता येतील असे ते म्हणाले. वैचारिक मतभेद असूनही ते इतर पक्षांशी संवाद कायम ठेवतात असे मत यावेळी अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राबद्दल नितीन गडकरी यांचा सकारात्मक दृष्टीकोन कायम असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
नितीन गडकरी यांनी मागे एकदा भाजप कार्यकर्त्यांशी साधलेल्या संवादानंतर आणि नागपूरमध्ये तसेच इतर जिल्ह्यातही त्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्यामुळे गडकरींचे कौतुक होते आहे. त्यातून विरोधकांना मोदींविरोधात आपला पाडाव लागत नाही हे पाहून गडकरींनाच उभे का करू नये, असा भन्नाट विचार मनात आलेला आहे.