येत्या जूनमध्ये भारतीयांना १२ कोटी लसमात्रा मिळणार आहेत, अशी माहिती नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना मे महिन्यात एकूण ७.९४ कोटी लसमात्रांचे वाटप करण्यात आले होते.
राज्य व केंद्रशासित प्रदेशांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच ६० वर्षे वयाच्या व्यक्तींसाठी आता जूनमध्ये लसीकरण सुकर होईल. जूनमध्ये एकूण ६.०९ कोटी लसमात्रा राज्यासह केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येतील . देशभरातील खासगी रुग्णालयांनाही लससाठा जूनमध्ये वितरीत करण्यात येणार आहे. खासगी रुग्णालये जूनमध्ये ५.८६ कोटी लसमात्रा थेट विकत घेऊ शकतील. एकूण १२ कोटी लसमात्रा उपलब्ध होतील, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारच्या बेफिकीरीमुळेच मराठा आरक्षण गेलं
पंजाबमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर?
मेट्रोचा बट्याबोळ करूनही मुख्यमंत्र्यांकडून ट्रायल रनची नौटंकी
सेंट्रल व्हिस्टावर आक्षेप घेणाऱ्या याचिकादारांना १ लाखाचा दंड
लशींच्या वाटपाच्या कार्यक्रमाबाबत राज्यांना वेळीच माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून लशींचे योग्य ते नियोजन राज्यांना करता येईल. लस वाया जाऊ नये याकरता सरकारने लशींच्या वाटपाबाबत राज्यांनाही कळवण्याचे ठरवले आहे. लस आल्यानंतर तिचे योग्य वाटप करण्यासाठी राज्यांना तयार राहण्याचे आदेश आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. जेणेकरून लशी वाया जाण्याचे प्रमाण कमी असेल. राज्य सरकारने संबंधित अधिकारी वर्गाला लशीसंबंधी योग्य निर्देश द्यावेत असे राज्यांना आधीच सांगून ठेवलेले आहे.
लसीकरणाचा वेग तसेच लोकसंख्या या निकषांवर राज्यांना लसवाटप केले जाईल. लसी वाया जाण्याचे प्रमाण कुणाचे किती आहे यावरही आरोग्य मंत्रालय आता लक्ष ठेवून राहणार आहे.