बनावट ओळखपत्राच्या आधारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याचे भासवत लस घेणारी अभिनेत्री मीरा चोप्राचे प्रकरण चांगलेच तापले आहे. मीरा चोप्रा हिने तिच्यावरील आरोप फेटाळले असले तरीही ठाणे महापालिकेकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. महापालिकेकडून या प्रकरणाची चौकशी होणार असून पुढील तीन दिवसात या प्रकरणाची चौकशी पूर्ण करणार असल्याचे ठाणे महापालिकेतर्फे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात ठाकरे सरकारने लसीकरणाचा खेळखंडोबा केला आहे. एकीकडे लसीकरणाची कमतरता असल्याचे सांगत राज्यातील सर्व सरकारी लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. पण असे असतानाही अभिनेत्री मीरा चोप्रा हिला ठाण्यातील पार्किंग प्लाझा या सरकारी लसीकरण केंद्रावर लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणावरून अभिनेत्री आणि महापालिका प्रशासन दोन्हींवर टीकेची झोड उठली.
हे ही वाचा:
योगींनी पत्रकारांना दिले, महाराष्ट्रातील पत्रकारांचे काय?
पंतप्रधानांच्या ‘युवा’ योजनेतून तरुण लेखकांना प्रोत्साहन
अनिल देशमुख नंतर अनिल परब, फक्त दोन महिन्यांचे पाहुणे
कुठे आहे ठाकरे सरकार? मोदी सरकारनेच दिली पत्रकार पांडुरंग रायकर यांना मदत
यानंतर महापालिकेकडून या विषयाची चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे ठाणे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री मीरा चोप्रा हीने मात्र तिच्यावरचे सारे आरोप फेटाळले आहेत. याविषयीचे तिचे मत तिने ट्विटरवर व्यक्त केले आहे. यात मीरा असे सांगते की तिने कोणतीही गोष्ट नियमबाह्य करून कोविड १९ ची लस पदरात पाडून घेतली नाही.
पण मीरा चोप्राचा हा खुलासाही समाधानकारक नाहीये. कारण मीराच्या या खुलास्यानंतरही काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
- राज्यात सरकारी लसीकरण केंद्रावर १८-४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद असताना मीरा चोप्रा हिला सरकारी लसीकरण केंद्रावर लस मिळालीच कशी?
- जर मीरा हिने काही गैर केले नव्हते तर तिने तिच्या पोस्ट डिलीट का केली?
- जर ते ओळखपत्र बनावट होते तर मीरा चोप्राला हे स्पष्टीकरण द्यायला एवढा वेळ का लागला?
हे प्रश्न नेटकऱ्यांकडूनही मीराला विचारले जात आहेत.