शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात काँग्रेसचे यथेच्छ वाभाडे काढणारा शिवसेना पक्ष आता काँग्रेसचे गुणगान करण्यात मग्न झाला आहे. त्याच गुणगानाच्या भूमिकेतून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सध्या देशाचा कारभार काँग्रेसच्या पुण्याईमुळेच सुरू असल्याचे विधान केले. मात्र भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल करत शिवसेनेच्या बेगडी भूमिकेवर प्रहार केला आहे.
संजय राऊतांना अलीकडे नेहरूंच्या नावाने खूपच उचक्या लागतात. ते अगदी पगारी नोकरासारखं वागत आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या काळात असं काही म्हणण्याचे धाडस झाले असते का? नव्या मालकांनी इटालियन मातोश्रींचे गळाबंधन बांधलेले आहे. त्यामुळे रोज राहुलजींचे बूटपॉलिश सुरू असते, असे ट्विट करत भातखळकर यांनी राऊत यांच्या वक्तव्याच्या चिंध्या उडविल्या आहेत.
हे ही वाचा:
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या फोनने तारांबळ
कोविडमुळे कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना निवृत्ती वेतन, विमाभरपाई
मुंबईतील व्यापाऱ्यांनी मांडले राज्यपालांसमोर गाऱ्हाणे
तीन सदस्यीय समिती करणार अनिल परबांवरील आरोपांची चौकशी
काँग्रेसचे सरकार असताना झालेल्या कामामुळेच देशाचा कारभार आता सुरू आहे, असे वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने पूर्ण केलेल्या सात वर्षांबद्दल टीका केली. त्यावर भातखळकर यांनी उपरोक्त भाष्य केले.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून काँग्रेसची किती स्तुती करू आणि किती नको, असे शिवसेनेला झाले आहे. एकेकाळी काँग्रेसला शिव्यांची लाखोली वाहणारा शिवसेना पक्ष आता मात्र त्याच पक्षाची स्तुती करताना अजिबात थकत नाही. राहुल गांधींचेही म्हणणे सरकारने ऐकले पाहिजे असे म्हणत आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये सविस्तर प्रसिद्ध व्हायला लागली. राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्या पुण्याईवर देश चालला आहे, असे सांगण्याची हिंमतही मुखपत्रातून दाखवण्यात येऊ लागली आहे. ज्या शिवसेनेने इतकी वर्षे ज्या काँग्रेस पक्षावर यथेच्छ शाब्दिक प्रहार केले, त्यांच्यावर आता भाजपाकडून चिखलफेक होत आहे, असे म्हणत सत्तेसाठी काँग्रेसचे तोंड फाटेस्तोवर कौतुक करावे लागते आहे.