भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या हे अनिल परब यांच्या मागे हात धुवून लागले आहेत. अनिल परब यांच्या अर्धा डझन घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे असा आरोप करताना सोमैय्या यांनी अनिल परब हे अवघ्या दोन महिन्यांचे पाहुणे आहेत असे म्हटले आहे. अनिल देशमुख यांच्या नंतर आता अनिल परब यांचा नंबर आहे असे पुन्हा एकदा सोमय्या यांनी सांगितले आहेत. त्यामुळे आता अनिल परब हे देखील राजीनामा देणार का असा सवाल विचारला जात आहे.
महाराष्ट्रात जनता एकीकडे कोविड महामारीमुळे त्रस्त असताना दुसरीकडे सरकारमधील मंत्र्यांचे विविध कारनामे बाहेर येताना दिसत आहेत. आधी गृहमंत्री अनिल देशमुख यांना वसुलीच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागला आहे. तर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
हे ही वाचा:
दहावी मूल्यांकन पद्धतीबाबत शाळा, पालक संभ्रमातच
कोविडमुळे निराधार झालेल्या मुलांसाठी सरसावले मोदी सरकार
बनावट ओळखपत्राच्या आधारे अभिनेत्रीचे लसीकरण
वसुलीच्या ‘मातोश्री कनेक्शन’ची जोरदार चर्चा
भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी काही दिवसांपूर्वी अनिल परब यांच्या गुहागर येथील साई रिसॉर्टचे प्रकार बाहेर काढले. तर आता आरटीओ घोटाळ्याचा आरोप परब यांच्यावर झाला आहे. गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या आरटीओमध्ये सुरु असलेल्या महावसुली विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पाटील यांनी परिवहन विभागात बदल्यांचं रॅकेट कसं चालतं याचा पर्दाफाश आपल्या तक्रारीत केला आहे. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या मॅनेज करत असून ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करत आहेत असे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचं अभय आहे, असा दावा पाटील यांनी तक्रारीत केला आहे. पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिले आहेत. तर या प्रकरणी आता तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली गेली आहे.
यावरूनच अनिल परब यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आरटीओ ट्रान्सफर, एसटी तिकीट, दापोली रिसॉर्ट, म्हाडाची जमीन, बीएमसी कॉन्ट्रॅक्टर अशा विविध प्रकारच्या सहा घोटाळ्यांचे आरोप अनिल परब यांच्या विरोधात असून, वेगवेगळ्या पातळीवर त्याची चौकशी सुरू आहे. राज्याचे राज्यपाल, उच्च न्यायालय, लोकायुक्त यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. तर सीबीआय, ईडी, एनआयए, नाशिक पोलिस, पर्यावरण मंत्रालय, जिल्हाधिकारी अशा विविध पातळीवर या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे अनिल परब यांची दोन महिन्यातच गच्छंती होईल अशाप्रकारचे सूतोवाच सोमैय्या यांनी केले आहे. अनिल परब हे दोन महिन्यांचे पाहुणे आहेत असे सोमैय्या यांनी म्हटले आहे.
Anil Deshmukh के बाद Anil Parab
RTO Transfer, ST Ticket, Dapoli Resort, MHADA Land, Role of Bajrang Kharmate & Sachin Vaze, BMC Contractors GHOTALA
Maha Governor, HighCourt, Lokayukta taken cognizance
CBI, ED, NIA, ACB, Nasik Police, Enviroment Ministry Colector investigating pic.twitter.com/0IPotSI6zq
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 30, 2021
या आधी बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने एनआयएला दिलेल्या जबाबामध्ये अनिल परब यांनी आपल्याला वसुली करायला सांगितल्याचे म्हटले होते . तर काही दिवसांपूर्वी सोमैय्या यांनी अनिल परब यांच्यावर रिसॉर्ट घोटाळ्याचे आरोप केले होते. गुहागर येथे एका शेतजमिनीवर परब यांनी अवैधपणे साई रिसॉर्ट बांधले आहे असा दावा सोमैय्या यांनी केला आहे. त्यासंबंधी राज्यपालांची भेट घेऊन परब यांच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच परब यांची हकालपट्टी व्हावी अशीही मागणी सोमैय्या यांनी केली आहे.