31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणस्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीची मुख्यमंत्र्यांना उशिराने जाग

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीची मुख्यमंत्र्यांना उशिराने जाग

Google News Follow

Related

मराठी मातीत जन्मलेले आणि प्रत्येक श्वास भारतमातेच्या चरणी अर्पण करणारे महान स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उशिराने जाग आली असल्याचा आरोप केला जात आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी हा आरोप केला आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेचा आधार घेत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

शुक्रवार, २८ मे रोजी महान स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांची १३८ वी जयंती देशभरात उत्साहाने साजरी होत आहे. देशभरातील नेते सावरकरांच्या बद्दलचा आपला आदर व्यक्त करत आहेत, बॉलीवूड मधूनही सावरकरांवर चित्रपट साकारला जाणार असल्याची घोषणा केली जात आहे. पण दुसरीकडे सावरकरांची बदनामी करताना काही घटक दिसत आहेत. अशातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून निशाणा साधला गेला आहे.

हे ही वाचा:

सावरकर आणि ज्यू नि इस्राएल

आम आदमी पक्षाकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन

बॉलीवूडला पडली वीर सावरकरांची भुरळ, लवकरच येणार बायोपिक

मुख्यमंत्री सचिवालयातर्फे जाहीर करण्यात आलेले मुख्यमंत्र्यांचे २८ मे रोजीचे कार्यक्रम बघता ते दुपारी साडे तीन वाजता महिला व बाल विकास विभाग यांच्या दूरदृष्य प्रणालीद्वारे होणाऱ्या सादरीकरणात सहभागी होणार होते. पण नंतर त्यांचा सुधारित दौरा आला असून त्यात साडे बारा वाजता मुख्यमंत्री स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करणार असल्याचे उल्लेख करण्यात आला.

यावरूनच भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. ‘तमाम काँग्रेस नेत्यांना आदरांजली अर्पण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सावरकरांच्या जयंतीला जाग नसल्याचे भातखळकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या समवेत काँग्रेस पक्षाचे अनेक नेते हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उठल्या बसल्या अपमान करीत असतात. अशा परिस्थितीत स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या शिवसेना पक्षाने काँग्रेस सोबत युती केल्यापासून तेही काँग्रेसला सावरकर बदनामी वरून जाब विचारत नसल्याचे पाहायला मिळाले आहे. या आधारे भाजपाकडून कायमच शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली जात असते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा