भारताचा इंग्लंड दौरा येत्या काहीच दिवसांत सुरु होतोय. जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याला १८ जूनपासून साऊदम्प्टन येथे सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील पहिल्या दोन संघात हा सामना होणार आहे. ही मॅच जर ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल अर्थात आयसीसीने दिलं आहे. जर अंतिम सामना ड्रॉ झाला किंवा टाय झाला तर दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजयी घोषित केलं जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आयसीसीने केली आहे.
World Test Championship Final playing conditions announced https://t.co/ku0FTaSAeL via @ICC
— ICC Media (@ICCMediaComms) May 28, 2021
आयसीसीने अंतिम सामन्यासाठीची नियमावली जाहीर केली आहे. सामना अनिर्णित किंवा बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून ट्रॉफी देण्यात येईल, असं आयसीसीने जाहीर केलंय. तसंच २३ जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसात जर ३० तासांचा खेळ शक्य नसल्यास राखीव दिवसाचा वापर केला जाईल.
आयसीसीने घेतलेले दोन्ही निर्णय जून २०१८ मध्ये आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद लढत सुरू होण्यापूर्वी घेतले आहेत. पूर्ण पाच दिवसांच्या खेळानंतरही सामन्याचा निकाल न लागल्यास अतिरिक्त दिवसाचा खेळ होणार नाही आणि अशा परिस्थितीत सामना अनिर्णित घोषित केला जाईल.
सामन्यादरम्यान काही कारणाने ठराविक वेळ गेल्यास, आयसीसीचे सामनाधिकारी नियमितपणे संघ आणि माध्यमांना राखीव दिवसाचा वापर कसा करता येईल याविषयी माहिती देतील. राखीव दिवस वापरला जाईल की नाही, याची घोषणा पाचव्या दिवशी खेळाच्या शेवटचं सत्र सुरू होण्यापूर्वी केली जाईल. सामन्यात ग्रेड १ ड्यूक क्रिकेट बॉल वापरला जातील. या अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात नियमावलीनुसार काही बदल देखील पाहायला मिळू शकतात.
हे ही वाचा:
ग्लोबल टेंडरकडून निराशेनंतर ‘या’ सहा शहरांना विनंती
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठाणीला अटक
असं काय काळंबेरं आहे जे हे वसुली सरकार लपवू इच्छित आहे
आजच्या आज मराठा तरुणांच्या नियुक्तीचे आदेश काढा
क्रिकेटच्या सामन्यांची रणनीती ही शक्यतो मैदानावर सराव करताना आखली जाते. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम ७२ तास बंद खोलीत राहून न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक जाणून घेणार आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येईल