30 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणग्लोबल टेंडरच्या निराशेनंतर 'या' सहा शहरांना विनंती

ग्लोबल टेंडरच्या निराशेनंतर ‘या’ सहा शहरांना विनंती

Google News Follow

Related

मुंबई महापालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरला अत्यंत निराशाजनक प्रतिसाद मिळाल्याने महापालिकेने, जगातील सहा सिस्टर सिटीजकडे लसपुरवठ्याची मागणी केली आहे. सेंट पीटर्सबर्ग (रशिया), न्यूयॉर्क (अमेरिका), लॉस एंजेलिस (अमेरिका), बुसान (दक्षिण कोरिया), स्टुटगार्ट (जर्मनी) आणि योकोहोमा (जपान) या शहरांतील महापौरांना मुंबई महापालिकेकडून पत्रे रवाना झाली आहेत.

कोरोना लसीकरणासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं आहे. त्यातच काल एका पुरवठादाराने ग्लोबल टेंडरमधून माघार घेतल्यानंतर मुंबई महापालिकेने जागतिक स्तरावर लस मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरु ठेवले आहेत. त्या अनुषंगाने सहा सिस्टर सिटीकडे लस पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

मुंबईच्या सहा सिस्टर सिटीजसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांसंदर्भात यापूर्वी संबंध आले आहेत. तिथले अधिकारी-महापौर यांच्या भेटीगाठीही होत असतात. याच नात्याची आठवण करत कोविड काळात मदत करण्याचं आवाहन बीएमसीने केलं आहे.

सध्याच्या कठीण काळात मुंबईला कोविडशी लढण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता असल्याचे या पत्रांमध्ये म्हटलं आहे. तसंच, या शहरांनी यशस्वीपणे कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळे, मुंबई शहरालाही त्यांनी मदतीचा हात द्यावा आणि उपलब्ध असतील त्या लसीचे १ कोटी ८० लाख डोस द्यावेत अशी मागणी केली आहे. या लसीच्या डोसची किंमत कळवून पुढील व्यव्हार ठरवावा असंही या पत्रांत नमूद केलं आहे.

या सहा शहरांपैकी जपानमधील योकोहोमा या शहराने या पत्राला उत्तर दिलं आहे. आपल्या सध्या लस उपलब्ध नाही पण मुंबईसाठी आर्थिक मदत करण्याचं आश्वासन त्यांनी पत्राद्वारे महापालिकेला दिलं आहे.

हे ही वाचा:

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठाणीला अटक

असं काय काळंबेरं आहे जे हे वसुली सरकार लपवू इच्छित आहे

आजच्या आज मराठा तरुणांच्या नियुक्तीचे आदेश काढा

नेते, सेलिब्रिटींकडे वाटण्यासाठी औषध कसं आणि कुठून येतं?- उच्च न्यायालय

मुंबई महापालिकेनं कोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी ग्लोबल टेंडर काढलं होतं. एक कोटी लसींचे डोस खरेदी करण्यासाठी ८ पुरवठादार आले होते. यातील एक पुरवठादार फायझर कंपनीची अस्ट्रॅझेनेकाची लस पुरवणार होता. परंतु, कोणतंही कारण न देता फायझर अस्ट्रॅझेनेका कंपनीने ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा