28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामालाल किल्ला ताब्यात घेणे हे मोदी सरकारविरोधातील कारस्थान

लाल किल्ला ताब्यात घेणे हे मोदी सरकारविरोधातील कारस्थान

Google News Follow

Related

दिल्ली पोलिसांनी केलेल्या आरोपपत्रात उल्लेख

२६ जानेवारी २०२१ला शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ला परिसरामध्ये घडलेला हिंसाचार देशातील जनतेने घरबसल्या पाहिला. या हिंसाचाराच्या घटनेनंतर आता अधिक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात आता अतिशय धक्कादायक दावे उघड झाले आहेत. निषेध करणारे शेतकरी फक्त लाल किल्ला ताब्यात घेण्याचा मनसुबा बाळगून आंदोलन करत होता, असे या आरोपपत्रात नमूद केले आहे.

यामागील मुख्य हेतू मोदी सरकारची बदनामी करणे हाच होता. म्हणूनच खास २६ जानेवारी या दिवसाची निवड झाली. पोलिसांनी आपल्या ३ हजार २२४ पानी आरोपपत्रात लाल किल्ल्यावरील घडलेल्या हिंसाचाराचे वर्णन केले आहे. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टरच्या परेड दरम्यान दिल्लीत बर्‍याच ठिकाणी हिंसाचार भडकला होता. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, ठरलेल्या योजनेनुसार मोठ्या संख्येने शेतकरी लाल किल्ल्यात घुसले आणि काही तास त्यांनी हलकल्लोळ माजवला.

हे ही वाचा:

ऑलिंपिकच्या विरोधातील आवाज बुलंद

चंद्रपूरच्या तळीरामांना ठाकरे सरकारचे गिफ्ट, दारू बंदी उठवली

महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांच्या आदेशानेच पोलिसांची गुंडगिरी

भाजपा कार्यकर्त्याला पोलिसांकडून अमानुष मारहाणीनंतर संतापाचे वातावरण

शेतकर्‍यांना लाल किल्ला ताब्यात घ्यायचा होता आणि त्याचा वापर निदर्शने करण्यासाठी करायचा होता. जगभरात मोदी सरकारची बदनामी व्हावी या हेतूनेच २६ जानेवारी या दिवसाची निवड करण्यात आली होती. लाल किल्ल्यावरील हिंसाचाराच्या आरोपपत्रात दिल्ली पोलिस सूत्रांनी पुढे सांगितले की, नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान हरियाणा आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर खरेदी करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनीही संबंधित डेटा त्यांच्या आरोपपत्रात जोडला आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहेत. यामध्ये अभिनेता-कार्यकर्ते दीप सिद्धू सह इतरांवर आरोप आहेत. १७ मे रोजी हे आरोपपत्र दंडाधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आले. आता यावर २८ मे रोजी सुनावणी होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा