मुंबई महापालिकेने कोविड लसीसाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरमध्ये घोटाळा असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे. तर हा घोटाळा लपवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून टेंडरची मुदत वाढवण्यात आल्याचे सोमैय्या यांनी म्हटले आहे. सोमैय्या यांच्या आरोपांमुळे राज्यात नवे राजकारण तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना शिवसेनेची सत्ता उलथवून महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजपा सज्ज झाली आहे. त्यासाठी विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी शिवसेनेला जेरीस आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून होताना दिसत आहे. शिवसेना शासित मुंबई महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत कोविड लसीसाठी ग्लोबल टेंडर काढले. अशा पद्धतीच्या टेंडर काढणारी मुंबई महापालिका ही जगभरातील पहिली महानगरपालिका ठरली.
हे ही वाचा:
भारताने पार केला २० कोटी लसीकरणाचा टप्पा
ठाकरे सरकार दोन तोंडांनी बोलतय
रा.स्व.संघाच्या सेवाकार्याने कम्युनिस्टांना पोटदुखी
नालेसफाई, कचरा सफाईच्या नावाखाली तिजोरीचे सफाई
सुरुवातीला या टेंडरला अपेक्षित प्रतिसाद न आल्यामुळे त्याची मुदत वाढविण्यात आली. काल म्हणजेच मंगळवार, दिनांक २५ मे रोजी या टेंडरची मुदत संपत होती. सुरुवातीला या टेंडरच्या प्रतिसादात ३ निविदा आल्या होत्या. तर शेवटच्या एका तासात ५ निविदा आल्या. या सार्या निविदा बोगस असून यात कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नसल्याचे सोमैय्या यांनी म्हटले आहे. तर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महानगरपालिकेने ग्लोबल टेंडरची मुदत वाढवून ३० जून पर्यंत पुढे नेली आहे असा गंभीर आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे.
या आधी एप्रिल महिन्यात सेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेने आणि ठाकरे सरकारने रेमडेसिवीरचा घोटाळा केला होता आणि आता कोविड लसीचा घोटाळा केला आहे असे सोमैय्या यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेचा कोविड लस घोटाळा!
काल टेंडरची मुदत संपत होती, तर एका तासात 5 टेंडर आले!
हे 5 टेंडर बोगस आहेत, कोणतेही डॉक्युमेंटेशन नाही, तेच डॉक्युमेंट्स जोडण्यासाठी आता 8 दिवसांची मुदत वाढवली गेली
गेल्या महिन्यात मुंबई महानगरपालिका-ठाकरे सरकारने रेमडेसीवीर घोटाळा केला होता pic.twitter.com/18bNvVi9OD
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 26, 2021