गेल्या ६० वर्षांत काँग्रेसने काय केले, हे ट्विटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांना माजी केंद्रीय मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी कडक शब्दांत सुनावले आहे. कोरोनासारख्या महामारीविरोधात गेल्या १०० वर्षातील सर्वात मोठ्या लढाईचा पाया कॉंग्रेसने रचला असे म्हणत मिलिंद देवरा यांनी ट्विटरवर पक्षाचे गुणगान गायले. या ट्विटला माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी कडक शब्दात प्रत्युत्तर दिले असून, त्यांनी देवरा यांचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून एक यादी प्रसिद्ध केली आहे, काँग्रेसच्या काळात कशी रुग्णालये उभी राहिली हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
हे ही वाचा :
अबब!! चीनमध्ये ३ कोटी पुरुष अविवाहित…कशामुळे?
आदित्य ठाकरे दाखवा आणि फुकट लसीकरण मिळवा
सुशील कुमारला ६ दिवसांची पोलिस कोठडी
तुम्ही केंद्र सरकारकडे तोंड वेंगाडण्याच्या पलिकडे काय केले?
यादीमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, झेडस कॅडिला, सन फार्मा, डॉ. रेड्डी लॅब, दिल्ली एम्स, भोपाळ एम्स, रायपूर एम्स,ऋषिकेश एम्स, भुवनेश्वर एम्स, जोधपूर एम्स, पटना एम्स, सर गंगा राम आणि डीआरडीओ यांचा समावेश आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईत या सर्व संस्थांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचा उल्लेख केला गेला आहे. देवरा यांनी या सर्वांचे श्रेय कॉंग्रेस सरकारला दिले आहे. परंतु स्वराज कौशल यांनी मात्र यावर सणसणीत असे उत्तर देऊन मिलिंद देवरा यांची बोलतीच बंद केली. स्वराज कौशल यांनी मिलिंद देवरा यांना उत्तर देताना लिहिले की, “हे चुकीचे आहे, सुषमा स्वराज २९ जानेवारी२००३ ते २२ मे २००४ या काळातील भाजपा सरकारमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी ऋषिकेश, भोपाळ, रायपूर, पाटणा, भुवनेश्वर आणि जोधपूर येथे सहा एम्सची स्थापना केली.
This is not correct. @SushmaSwaraj was Union Health Minister in BJP government from 29Jan 2003-22 May 2004. She set up Six AIIIMS at Rishikesh, Bhopal, Raipur, Patna, Bhubaneshwar and Jodhpur. She started work with 100 acres land for each aiims and Rs.2,000/- Cr for construction. https://t.co/l0nFuZcbmy
— governorswaraj (@governorswaraj) May 23, 2021
केवळ इतकेच नाही तर, त्यांनी १०० एकर जमीन आणि २००० कोटी रुपयांसह प्रत्येक एम्सचे बांधकाम सुरू केले. लोकांनी सुषमा स्वराज यांना विचारले की तुम्हाला १०० एकर जमिनीची का गरज आहे? त्यावर त्या म्हणाल्या, “मला एअर अॅम्ब्युलन्स उतरण्यासाठी एक हवाई पट्टी आणि हेलिपॅड हवे आहे. रुग्णालयाचे सर्व कर्मचारी – तंत्रज्ञ, नर्स आणि डॉक्टर आपत्कालिन परिस्थितीतही एम्सच्या परिसरात राहिले तर ते कायम उपलब्ध असतील. स्वराज म्हणतात, खास तुमच्या माहितीसाठी म्हणून १५ ऑगस्ट २००३ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान घोषणा केली होती. प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजना या अंतर्गत पटना, रायपूर, भोपाळ, भुवनेश्वर, जयपूर आणि ऋषिकेश येथे नवीन एम्स रुग्णालये सुरू करण्याची घोषणा केली होती.