कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर औषध कंपन्या कोविड -१९ लस पुरवण्यासाठी आता केवळ केंद्राशीच व्यवहार करण्यास प्राधान्य देत आहेत. जगभरात आजही कोविड-१९ या आजारावर तयार होणारी लस कमी पुरवठ्याने वितरित केली जात आहे. नुकतेच पंजाब राज्य सरकारने कंपनीशी लस मिळवण्याबाबत विचारणा केली असता कंपनीने मात्र हा प्रस्ताव धुडकावून लावत केवळ केंद्राशी बोलणी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
हे ही वाचा:
दहा तासानंतर तो म्हणाला, आप्पा, मी सुरक्षित आहे!
सुशील कुमारला ६ दिवसांची पोलिस कोठडी
‘इंडियन व्हेरीअंट’ म्हणणाऱ्या कमलनाथांवर गुन्हा
कोवॅक्सिनला जागतिक मान्यता देण्यसाठी केंद्राकडून प्रयत्न
मॅसेंजर आरएनए (एमआरएनए) लस विकसित करणार्या मॅसेच्युसेट्स आधारित बायोटेक्नॉलॉजीच्या मॉडर्ना कंपनीने पंजाब सरकारला त्याची लस थेट पुरवण्याची विनंती नाकारली आहे. त्यामुळेच राज्य आणि खासगी कंपनी यांच्याशी संधान न साधता थेट केंद्राशी संपर्क साधत आहेत. अमेरिकेन कंपनी त्यांच्या धोरणानुसार केवळ केंद्र सरकारशीच व्यवहार करते. सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार मॉडर्ना कंपनीकडे वर्षाअखेरीस लसींचा अतिरिक्त पुरवठा नव्हता.
फायजरच्या लसीबाबत या कंपनीशी काही चर्चा करणे बाकी आहे. त्यानंतरच या लसीचा पुरवठा भारतामध्ये होईल अशी माहिती फायजर या कंपनीबाबत बोलताना केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली.
भारतामध्ये कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस हा तीन ते चार महिन्यांनी देण्यात येणार यावर केंद्रसरकार ठाम आहे. एकूणच भारताची लोकसंख्या बघता प्रत्येकाला लस मिळावी हाच हेतू यामागे आहे. पहिल्या लसीच्या डोसनंतर लस घेणाऱ्याच्या शरीरात पुरेशा प्रमाणात अंटीबॉडी तयार होत असल्याचे दिसून येत आहे.