केंद्र सरकारने अनेक अकुशल, मध्यम कुशल आणि कुशल कामगारांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार या गटातील सर्व कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पूर्वलक्ष्यी प्रभावाने १ एप्रिल २०२१ पासून करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे विविध स्तरावरील किमान वेतन ३५२ रुपयापासून ते ८५३ रुपयापर्यंत वाढणार आहे.
केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगावर यांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयामुळे सुमारे दीड कोटी कामगारांचे हित साधले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रोजंदारी वर असणारे कामगार उदाहरणार्थ बांधकाम क्षेत्रातील, खाणकाम क्षेत्रातील कामगार तसेच स्वच्छता कर्मचारी, हमाल, यांसारख्या अगदी तळातील कामगारांचे देखील कल्याण होऊ शकेल. कामगारांच्या या वेतनात नव्या ग्राहक मूल्य निर्देशांकानुसार (सीपीआय) बदल केला आहे.
हे ही वाचा:
वैमानिक दीपक साठे यांची नुकसानभरपाई ठाकरे सरकारने अडवली
भारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु सुशील कुमारला जालंधर येथून अटक
देशाला कोविड पाठोपाठ काळ्या बुरशीची चिंता
शेती क्षेत्रातील अकुशल, मध्यम कुशल आणि कुशल कामगारांसाठी हे वेतन ३७२ रुपये ते ५४० रुपये या दरम्यान कुशलतेनुसार अवलंबून असेल. मालाची चढ-उतार करणाऱ्यांसाठी हे वेतन ४३१ रुपये ते ६४५ रुपये या दरम्यान आहे.
अशाच तऱ्हेने केंद्रीय मंत्रालयाकडून विविध क्षेत्रातील दर ठरविले गेले आहेत. या दरांमध्ये अधिकतम रोजगार हा ८५३ रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे. या दरांमध्ये मजूर अथवा कामगारांसोबतच निरिक्षकांचा देखील विचार केला गेला आहे.