वंदे भारत मिशन अंतर्गत उड्डाण केलेल्या दुबई- कोझिकोडे या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी कॅप्टन दीपक साठे यांच्या कुटुंबियांना एअर इंडियाने दिलेली नुकसानभरपाईची रक्कम ठाकरे सरकारच्या कामगार आयुक्त कार्यालयाने अजून मिळू दिली नसल्याची अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. यावरून भाजपाने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून सरकारवर तोफ डागली आहे.
जगात कोविड महामारीमुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतर मायदेशी येऊ इच्छिणाऱ्या अनेक अनिवासी भारतीयांसाठी भारत सरकारने वंदे भारत मिशनला सुरूवात केली. या मिशन अंतर्गत एअर इंडियाने अनेक उड्डाणे करून ठिकठिकाणी अडकलेल्या भारतीय आणि इतर देशांच्या नागरिकांना देखील भारतात आणले होते. याच मिशन अंतर्गत एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान आयएक्स-१३४४ हे दुबईहून कोझिकोडे येथे येत होते. कोझिकोडेच्या कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना या बोईँग ७३७-८०० जातीच्या विमानाचा अत्यंत दुर्दैवी अपघात झाला होता. या अपघातात विमानात असलेल्या १८४ पैकी १९ उतारूंचा मृत्यु झाला, तर विमानाचे दोन्ही वैमानिक मारले गेले. त्यामध्ये या विमानाचे कप्तान दीपक साठे यांचा समावेश होता. मात्र, अपघातापूर्वी वैमानिकांनी विमानाची इंजिन बंद केल्यामुळे अपघात घडल्यावर आग लागली नाही. त्यामुळे अधिक जीवीतहानी झाली नाही.
हे ही वाचा:
प्रदीप गावडे यांच्या अटकेवरून चित्रा वाघ कडाडल्या
देशाला कोविड पाठोपाठ काळ्या बुरशीची चिंता
अजित दादा, उद्धव ठाकरेंना सल्ला द्या
या अपघातानंतर एअर इंडियाकडून तात्काळ मदत देण्यात आली होती. मात्र ठाकरे सरकारच्या कामगार आयुक्त कार्यालयाने अजूनही अडवून ठेवली असल्याचा आरोप भाजपा मुंबईकडून ट्वीटर वरून करण्यात आला आहे. या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणेच त्यांच्या अधिकाऱ्यांतही कामे अडवा, पैसे जिरवा प्रवृत्ती फोफावली असल्याचा टोला देखील लगावण्यात आला आहे. या ट्वीटमध्ये म्हटले आहे की,
सरकार चालवताय की, नाक्यावरची टपरी? दिवंगत पायलट कॅप्टन दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची मदत कामगार आयुक्त कार्यालयाने अडवलीय. प्रशासनावरचा अंकुश गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सारखीच अधिकाऱ्यांमध्येही ‘कामे अडवा, पैसे जिरवा’ प्रवृत्ती फोफावलीय.
सरकार चालवताय की,
नाक्यावरची टपरी?
दिवंगत पायलट कॅप्टन दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची मदत कामगार आयुक्त कार्यालयाने अडवलीय. प्रशासनावरचा अंकुश गमावलेल्या मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्या सारखीच अधिकाऱ्यांमध्येही 'कामे अडवा, पैसे जिरवा' प्रवृत्ती फोफावलीय.#mahavasooliaaghadi pic.twitter.com/oYPyUZexaD— BJP MUMBAI (@bjp4mumbai) May 22, 2021