त्रिपुरा राज्यातून पहिल्यांदाच उत्तम प्रतिच्या फणसाची निर्यात लंडनला केली जात आहे. ईशान्य भारतातील शेती उत्पन्नाला चालना देण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्रिपुरातून १.२ मेट्रीक टन फणसाची निर्यात केली जात आहे.
यासाठी अनेक संघटनांचा एकत्रित हातभार लागला आहे. या फणसांच्या निर्यातीची संकल्पना त्रिपुरातील संयोग ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. या कंपनीने मांडली होती. त्यानंतर या फणसांना वेष्टित करण्याचे काम ॲग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टस एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे (एपीईडीए) सहाय्य लाभलेल्या सॉल्ट रेंज सप्लाय चेन सोल्युशन लि. या कंपनीत करण्यात आले होते. हे फणस किएगा एक्झिम प्रा. लि. या कंपनीने या फणसांच्या निर्यातीचे कार्य पार पाडले आहे.
हे ही वाचा:
आंध्रातील नेल्लोरमध्ये कोरोनावर आयुर्वेदिक औषध?
२०२१ च्या अखेरपर्यंत सर्व प्रौढांचे लसीकरण करणार
जेष्ठ संगीतकार विजय पाटील यांचे निधन
चक्रीवादळापेक्षा जास्त वेगाने मुख्यमंत्र्यांचा दौरा
एपीईडीएने युरोपियन महासंघात निर्यात करण्यासाठी वेष्टन गृहाला मान्यता मे २०२१ मध्ये देण्यात आली होती. एपीईडीकडून सातत्याने विविध मार्गांनी ईशान्य भारतातील निर्यातीत पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातो.
नुकतीच लाल भाताची पहिली खेप अमेरिकेला आसाममधून निर्यात करण्यात आला होता. लोहयुक्त असलेला लाल भात हा आसाममधील प्रमुख अन्नघटक आहे. या तांदूळाला बाओ-धन या नावाने ओळखले जाते. याबद्दल वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक काढून सविस्तर माहिती दिली आहे.
एपीईडी सातत्याने ईशान्य भारतातील कृषी उत्पादनाला निर्यातीत अग्रेसर करण्याच्या प्रयत्नात राहिली आहे. त्यासाठी ईशान्य भारताचा पायाभूत सुविधांच्या बाबत विकास करण्याचा प्रयत्न देखील या संस्थेकडून केला जात आहे.