देशात सध्या कोविडचा कहर वाढत आहे. भारत एकत्रितपणे कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. भारताला त्यासाठी जागातील अनेक देशांनी विविध प्रकारचे सहाय्य केले आहे. यामध्ये एकूण ४० देशांनी सहाय्य केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं आहे.
भारताला कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. अशा वेळेला सारा देश एक होऊन हिंमतीने कोविडचा सामना करत आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही वैद्यकिय गोष्टींचा तुटवडा देशात निर्माण झाला होता. त्यासाठी भारताला जगातील विविध देशांनी सहाय्य केले होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की सुमारे ४० देशांनी भारताला सहाय्य केले आहे. मोठ्या प्रमाणातील देशांनी भारताच्या कोविडच्या दुसऱ्या लाटेशी चालू असलेल्या लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे. ४० पेक्षा अधिक राष्ट्रांनी कोविडशी निगडित सामान- उत्पादने इंडियन रेड क्रॉस सोसायटीमार्फत पाठवली आहेत.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे दिखाऊपणा
महाराष्ट्रातही चित्रीकरणाला परवानगी द्या
भारताच्या कोविडच्या दुसऱ्या लाटेविरुद्धच्या लढ्याला अनेक देशांचे सहाय्य लाभले. सौदी अरेबिया, सिंगापूर, जर्मनी यांसारख्या देशांकडून ऑक्सिजन टँकर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध झाले होते. त्याबरोबरच स्वित्झरलँड, नेदरलँड यांसारख्या देशांनी देखील मदत पाठवली होती. दक्षिण कोरियाकडून मोठ्या प्रमाणात टेस्टिंग किट आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध झाले होते.
भारताने देखील यापूर्वी अनेक देशांना सहाय्य केले होते. कोविडच्या पहिल्या लाटेचा सामना करण्यासाठी भारताने अनेक देशांना औषधे पुरवली होती.