भारत आणि पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी २०२१मध्ये युद्धबंदी झाल्यानंतर आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या अगदी नजीक एक कॅफे चालू करण्यात आला आहे. त्यामुळे आता तिथे बसून मनोहारी दृश्य पाहाता हातातील कॉफीचा आनंद घेणे पर्यटकांना देखील शक्य होणार आहे. हा कॅफे भारतीय सैन्यामार्फत चालवला जात आहे.
हे कॉफी शॉप कमान अमन सेतू या ठिकाणी चालू करण्यात आले आहे. कमान अमन सेतू हा भारतीय सैन्याचा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील शेवटचा फॉरवर्ड पोस्ट आहे. या कॉफी शॉपचा आनंद संपूर्ण जम्मू आणि काश्मिर केंद्रशासित प्रदेशातील लोकांना घेता येणार आहे.
हे ही वाचा:
केरळातील डाव्यांची घराणेशाही उघड
केजरीवालांचे बेजबाबदार वक्तव्य- एस. जयशंकर
बंगाली हिंदूंच्या प्रश्नावर १५ दिवसांनी न्यायालयाने घेतली दखल
मुख्यमंत्र्यांनी निदान मुंबईचा तरी दौरा करावा
मेजर विशाल देव यांनी सांगितले की,
आम्ही या कॉफी शॉपची निर्मिती प्रेरणादायक हेतूने कमान पोस्टला भेट द्यायला येणाऱ्या प्रत्येकासाठी केली आहे. कमान सेतूसोबत फोटो काढून झाल्यानंतर पर्यटक येथे काही खानपानाचा आनंद घेऊ शकतील आणि त्यासोबत घरी काही भेटवस्तू देखील घेऊन जाऊ शकतील.सहा फूटी राष्ट्रीय झेंडा एलओसीवर फडकत आहे.
एलओसीवर शांतता प्रस्थापित झाल्यामुळे या रेषेच्या जवळ राहणाऱ्या लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. सातत्याने होणाऱ्या युद्धबंदीच्या निर्णयाचा भंग केला जात असल्याने या लोकांना सातत्याने निवाऱ्यासाठी, घरासाठी धावाधाव करावी लागत असे. गेले काही काळ कोणत्याही तऱ्हेने भंग न झाल्यामुळे लोक शांततेने जगू शकत आहेत.
शांतता पुन्हा एकदा प्रस्थापित केली जात असल्याने दोन्ही देशांमधील व्यापाराला पुन्हा एकदा प्रारंभ होईल अशी आशा काही स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सुशील कुमार कितीही मोठा कुस्तीगीर
असला तरी तो त्यानी मानव वधाचा फार मोटा गुन्हा केला त्याने केलेले कृत्य से निंदनीय आहे
अशोभनीय आहे।
त्याच्यावर कारवाई होणे निलंबन करने से योग्य आहे