काल संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला तौक्ते वादळाचा तडाखा बसला. समुद्रात अडकलेल्या पी३०५ या तराफ्यावरील १८४ जणांची सुटका करण्यात नौदलाला यश आलं आहे, तर १४ मृतदेह अरबी समुद्रातून काढण्यात नौदलाला यश आलं आहे. त्याशिवाय अजून २ नौका अडकल्या असून त्यांच्या बचावाचे कार्य देखील चालू असल्याचे समजले आहे. यामुळे अजून ३०० लोकांचे प्राण वाचवण्यात यश आल्याचे कळले.
तौक्ते वादळाने संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला विळखा घातला होता. मुंबईच्या किनाऱ्यापासून ३५ समुद्री मैल दूर हा पी३०५ तराफा बुडला होता. ओएनजीसीच्या हीरा या प्लॅटफॉर्मला पी३०५ हा तराफा बांधला होता. हीरा हा ओएनजीसीचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. वादळामध्ये या तराफा नांगर तुटल्यामुळे सोमवारी संध्या हा तराफा बुडू लागला. त्यामुळे यावरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी खवळलेल्या समुद्रात उडी मारली होती. या लोकांना वाचवण्याचे अत्यंत अवघड कार्य नौदलाने करायला सुरूवात केली.
हे ही वाचा:
पश्चिम किनारपट्टीनंतर आता पूर्वेला वादळाचा फटका?
व्हीव्हीआयपी लस घेतल्याने कुलदीप यादव अडचणीत
सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोहही करू शकते
मराठा आरक्षण: भाजपा नेत्यांनी पंतप्रधानांना भेटून बाजू मांडावी
नौदलाच्या बचाव कार्यात आयएनएस बिआस, आयएनएस बेटवा, आयएनएस तेग या नौकादेखील आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता या नौकांना बचावकार्यात सामिल झाल्या होत्या. त्यासोबतच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने देखील शोध आणि बचाव शोध मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती.
वाचलेल्या काही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा तराफा रात्री सव्वादहाच्या आसपास ओएनजीसी ऑईल रिगपासून वेगळा झाला. वादळामुळे हा तराफा भरकट गेला, आणि कोकण किनाऱ्याला जाऊन अडकला. सोमवारी सकाळी या तराफ्यातील निवासी भागात पाणी भरू लागल्याने खलाशांना तराफ्याच्या डेकवर जावे लागले. त्यानंतर तराफा बुडू लागल्याने खलाशांनी समुद्रात उड्या मारल्या. तराफ्यावरील खलाशांनी तराफा सोडण्यापूर्वी मदतीसाठी रेडिओ संदेश पाठवला होता. तो संदेश मिळाल्यानंतर नौदलाने मोठ्या प्रमाणात शोध आणि बचावकार्याला सुरूवात केली होती.