31 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषतौक्तेमुळे दीड दिवस वीजेचा खोळंबा

तौक्तेमुळे दीड दिवस वीजेचा खोळंबा

Google News Follow

Related

तौक्ते चक्रीवादळ आता गुजरातमध्ये घोंघावू लागले असले तरी महाराष्ट्रात या वादळाने मोठे नुकसान केले. विशेषतः वीजपुरवठ्यावर वादळाचा मोठा परिणाम जाणवला. तारा तुटल्यामुळे आणि वीजेचे खांब कोसळल्यामुळे जवळपास २० लाख लोकांपर्यंत वीज पोहोचू शकली नाही. काही भागात तर सलग ३५ तास वीजेचा खोळंबा झाला आणि जनजीवन अंधारात बुडून गेले. राज्याच्या ऊर्जा विभागाने मात्र वीजेची ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत असल्याचे म्हटले आहे. या वीजपुरवठ्याचा प्रश्न प्रामुख्याने किनारपट्टीलगतच्या गावांना आणि शहरांना बसला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास १९ लाख लोकांचा वीजपुरवठा वादळामुळे खंडित झाला.

हे ही वाचा:
म्युकरमायकॉसिस बाबतदेखील मुख्यमंत्री पुन्हा कोणाचा तरी खांदा शोधणार?

भारतीय उपखंडावर मान्सूनचे आगमन वेळेवर

सुशीलकुमारचा ठावठिकाणा सांगा आणि मिळवा १ लाख

जगाला हिटलरची गरज म्हणणाऱ्या पाक पत्रकाराची हकालपट्टी

मंगळवारी यासंदर्भातील जी माहिती जारी करण्यात आली त्यानुसार या दोन जिल्ह्यांतील ३६६५ गावांतील ५२ टक्के वीजग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. तर इतर ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी ऊर्जा विभागाचे १३ हजार कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील १३३८९ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. रायगडमधील ८३८३, रत्नागिरी आणि पालघरमधील अनुक्रमे ४५६३ आणि २०० लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

या चक्रीवादळामुळे मुंबईतील पावसाने अनेक विक्रम नोंदविले. जवळपास २३० मिमी पाऊस या काळात झाला. गेल्या २४ तासांतील ही सर्वोच्च जलवृष्टी होती. सांताक्रूझ वेधशाळेच्या अंदाजानुसार मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत २३०.३ मिमी पाऊस झाला आहे. कुलाबा वेधशाळेनुसार या कालावधीत २०७.६ मिमी पावसाची नोंद केली आहे. आयएमडीच्या गणनेनुसार २०४.५ मिमी पाऊस झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा