31 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषआठवड्याला ५५ तासांपेक्षा अधिक काम ठरते मृत्युचे कारण

आठवड्याला ५५ तासांपेक्षा अधिक काम ठरते मृत्युचे कारण

Google News Follow

Related

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार अधिक काळासाठी काम करणे अनेकांसाठी प्राणघातक ठरत आहे, आणि कोविड-१९ मुळे ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

एन्वायर्मेंट इंटरनॅशनल या नियतकालिकात कामाच्या तासांशी निगडीत झालेल्या मृत्युंचा प्रथमच जागतिक स्तरावर अभ्यास करण्यात आला होता. त्यातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार २०१६ मध्ये ७ लाख ४५ हजार लोकांचा अनेक तासांच्या कामाशी संबंधित असलेल्या हृदयरोग आणि स्ट्रोकमुळे मृत्यु झाला होता. हा आकडा २००० मधल्या आकड्यापेक्षा तब्बल ३० टक्क्यांनी अधिक आहे.

हे ही वाचा:

म्युकरमायकॉसिस बाबतदेखील मुख्यमंत्री पुन्हा कोणाचा तरी खांदा शोधणार?

कोरोनाला ‘इंडियन व्हायरस’ म्हणत चीनी देणग्यांची परतफेड

काय आहे कोरोनाची तिसरी लाट आणि सिंगापूरमधील नवा कोरोनाचा प्रकार?

भारतीय उपखंडावर मान्सूनचे आगमन वेळेवर

हिंदुस्तान टाईम्स वृत्तपत्रात आलेल्या वृत्तानुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या पर्यावरण, पर्यावरणीय बदल आणि आरोग्य विभागाच्या संचालिका मारिया नेईरा यांनी यावेळी बोलताना सांगितले की,

प्रत्येक आठवड्याला ५५ तासांपेक्षा अधिक काळ काम करणे हे प्रकृतीसाठी अत्यंत धोकादायक आहे. आम्हाला या अभ्यासातून अधिकाधीक लोकांना कृती करण्यासाठी उद्युक्त करायचे आहे आणि कामगारांसाठी अधिक सुरक्षा पुरवायची आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून असे लक्षात आले की, यामध्ये बळी पडलेले बहुतांशी लोक (जवळपास ७२%) हे मध्यमवयीन अथवा त्यापेक्षा अधिक वयाचे पुरुष होते.

यामध्ये असेही दिसून आले की, जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेल्या दक्षिण-पूर्व आशिया आणि पश्चिमी प्रशांत भाग ज्यात चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश होतो, तिथे बहुतांशी लोक यामुळे प्रभावीत झालेले होते.

या अभ्यासासाठी २०००-२०१६ कालखंड निश्चित करण्यात आला होता, त्यामुळे यात कोविड-१९ महामारीचा कालावधी अभ्यासला गेला नाही. परंतु अनेक तज्ज्ञांच्यामते दूरस्थ काम करण्याची पद्धत आणि अर्थव्यवस्थेचा घटलेला वेग यामुळे या संख्येत वाढच झाली असण्याची शक्यता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, महामरीमध्ये अशा गोष्टींना चालना मिळत आहे, ज्यामुळे थेट अधिक काळासाठी काम करण्याला प्रोत्साहन मिळेल. त्याबरोबरच जगातील किमान ९ टक्के लोक अधिक तास काम करतात असे भाकित देखील त्यांनी केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा