महाराष्ट्रात सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. परंतु सातत्याने केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या ठाकरे सरकारने लसींच्या बाबत देखील केंद्राकडे बोट दाखवत ऐन कोविडच्या लाटेत १८-४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद केले आहे. एकीकडे लसीकरण बंद केले आहे, आणि दुसरीकडे मुंबईतील तीन बड्या खासगी रुग्णालयांना मात्र लस प्राप्त होत आहे. खुद्द शिवसेनेच्याच उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळेंनी आरोग्यमंत्र्यांना हा सवाल केला असल्याचे वृत्त वृत्तपत्रतात झळकले होते. त्याचाच आधार घेत भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
एका वृत्त पत्रात प्रसिद्ध झाल्याप्रमाणे शिवसेनेच्याच उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे यांनी मुंबईतील तीन बड्या खासगी रुग्णालयात लस उपलब्ध होत असून ही रुग्णालये १८-४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्याबरोबरच त्यांनी हा प्रकर बंद करण्याची विनंती देखील केली आहे.
हे ही वाचा:
सत्ताधारी शिवसेनेने महापालिकेच्या तिजोरीची सफाई केली
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची झापडं मुंबई-बारामती पुरती
कोविन आता प्रांतिक भाषांमध्येही उपलब्ध होणार
धक्कादायक! भाजपासारखा व्यापक विचार करा, खुर्शीद यांचा काँग्रेसला सल्ला
मात्र यावरून भाजपाचे आक्रमक नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये या संपूर्ण प्रकारात वसूली सरकारचा कट असल्याचा घणाघात केला आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात,
ठाकरे सरकार मोफत लस देत नाही कारण खासगी हॉस्पिटलची दुकाने सुरू राहिली पाहिजे. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे आणि त्याच पक्षाचे पदाधिकारी जितेंद्र जानवले आरोग्यमंत्र्यांना ही दुकानदारी बंद करण्याचे आर्जव करतायत. अहो जानवले, कशी बंद होईल ही दुकानदारी? वसूली सरकारचा ‘कट’ आहे त्यात.
ठाकरे सरकार मोफत लस देत नाही कारण खासगी हॉस्पिटलची दुकाने सुरू राहिली पाहिजे. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे आणि त्याच पक्षाचे पदाधिकारी जितेंद्र जानवले आरोग्यमंत्र्यांना ही दुकानदारी बंद करण्याचे आर्जव करतायत.
अहो जानवले, कशी बंद होईल ही दुकानदारी? वसूली सरकारचा 'कट' आहे त्यात. pic.twitter.com/BXDnbgJZJK— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 17, 2021