उत्तराखंडमध्ये सोमवारी पहाटे पाच वाजता भगवान केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या खास मुहूर्तावर भाविकांची अनुपस्थिती होती. गेल्या वर्षीही कोरोना विषाणूमुळे भाविकांची अनुपस्थिती होती. प्रथेप्रमाणे गेल्यावर्षी १९ नोव्हेंबर रोजी केदारनाथ धामचे दरवाजे बंद करण्यात आले होते.
केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यापूर्वी संपूर्ण मंदिर ११ क्विंटल फुलांनी सजवले गेले होते. यावेळी संपूर्ण केदारनाथ धामचे वातावरण भक्तिमय झाले होते. मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या वेळी केदारनाथ रावल भीमाशंकर लिंग आणि मंदिराचे मुख्य पुजारी बागेश लिंग, प्रशासनाचे लोक आणि काही स्थानिक मंडळी उपस्थित होते.
कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून सोमवारी (१७ मे) सरकार आणि देवस्थान बोर्डाने केदारनाथचे दरवाजे उघडले. तथापि, आत्ताच कोणालाही मंदिराच्या गर्भगृहात जाण्याची परवानगी नाही.
मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी ट्वीट केले की, “जगातील प्रसिद्ध अकरावे ज्योतिर्लिंग श्री भगवान केदारनाथ धामचे दरवाजे आज सोमवारी (१७ मे) पहाटे पाच वाजता विधीवत पूजा आणि अनुष्ठानानंतर उघडण्यात आले. मेष लग्नाच्या शुभ मुहूर्तावर मंदिराची कपाटं उघडली गेली.”
हे ही वाचा:
…आणि इस्लामिक देश आपापसातच भांडले
डीआरडीओचे कोरोनावरील औषध आता रुग्णांसाठी उपलब्ध
तौक्ते वादळ: मुंबईत दोन तासात १३२ झाडं पडली
टुकार सरकार सत्तेवर असल्यास, राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडणारच
तर दुसरीकडे, चमेलीच्या बद्रीनाथ धामचे दरवाजे मंगळवारी पहाटे ४.१५ वाजता उघडले जाणार आहेत.