25 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषरा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी सुरु केले २० वर्ष बंद पडलेले हॉस्पिटल

रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी सुरु केले २० वर्ष बंद पडलेले हॉस्पिटल

Google News Follow

Related

संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. देशामध्ये रोज लाखोंच्या संख्येने नवे कोरोनाग्रस्त आढळत आहेत. लाखो रुग्णांवर एकाच वेळी उपचार होत असल्यामुळे देशात आरोग्यव्यवस्थेवर ताण पडतो आहे. रुग्णालये रुग्णांनी गच्च भरली आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन देशात अनेक सामाजिक संस्था, संघटना मदतीसाठी पुढे येतायत. कर्नाटकमधील कोलार गोल्ड फिल्ड येथे आरएसएस आणि भाजपनेसुद्धा मोठे योगदान दिले आहे. त्यांनी एकाच वेळी ३०० कोरोना रुग्णांवर उपचार करता येईल असे कोविड सेंटर उभारले आहे. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी मागील वीस वर्षांपासून बंद पडलेल्या रुग्णालयाची अवघ्या १५ दिवसांत डागडुजी केली आहे.

कर्नाटकमध्ये कोलार गोल्ड फिल्ड (केजीएफ) येथे भाजपा आणि आरएसएसच्या काही कार्यकर्त्यांनी एक कोविड सेंटर सुरु केले आहे. हे कोविड सेंटर बंगळुरुपासून १०० किमी दूर असून त्याच्या उभारणीमागची गोष्ट मोठी रंजक आहे. या कोविड सेंटरसाठी जवळपास ३०० स्वयंसेवकांनी मेहनत घेतलीये. याविषयीची अधिक माहिती कोलार जिल्ह्याचे भाजपचे खासदार एस. मुनीस्वामी यांनी दिलीये. “कोलार येथील भारत गोल्ड माईन लिमीटेड हॉस्पीटल तसे खूप जुने आहे. या रुग्णालयामध्ये खाणीमध्ये काम करणाऱ्यांवर उपचार केले जायचे. मात्र, नंतर हे रुग्णालय २००१ मध्ये बंद पडले. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भाजपच्या केएफजी शहराध्यक्षांनी या रुग्णालयाच्या जुन्या इमारतीचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्याविषयी कल्पना दिली. त्यांतर आम्ही कामाला लागलो,” असे मुनीस्वामी यांनी सांगितले.

भारत गोल्ड माईन लिमीटेड रुग्णालयात सध्या कोरोना रुग्णांवर उपाचार करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी संघ परिवाराच्या स्वयंसेवकांनी कशी मेहनत घेतली याबद्दल एस. मुनीस्वामी यांनी विस्ताराने सांगितले आहे. बीजीएमएल या हॉस्पिटलवर यापूर्वी १२०० लोक अवलंबून होते. या रुग्णालयात ८०० बेड्स होते. मात्र, हे रुग्णालय २००१ साली बंद पडले. सध्या बेड्स कमी पडत असल्यामुळे आमच्या संघ परिवाराने याच ठिकाणी ३०० रुग्णांवर उपचार करता येईल, असे कोविड सेंटर उभे करण्याचे ठरवले. त्यासाठी जवळपास २५० लोकांनी दिवसरात्र काम केले. त्यानंतर न थकता काम केल्यामुळे अवघ्या १५ दिवसांमध्ये येते कोविड सेंटर उभे आहे. या ठिकाणी एकाच वेळी २२० रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. हे कोविड सेंटर येत्या सोमवारी सुरु होईल,” असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

सध्याच्या इस्रायल-पॅलेस्टाईन वादातील हमास म्हणजे नक्की काय?

आता बँक बुडाली तरी ठेवीदारांना चिंता नाही, मोदी सरकारचा नवा नियम

ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला

मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक

दरम्यान, या बीजीएमएल रुग्णालय परिसरातील सर्व कचरा साफ करुन त्याला रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच येथे आता २२० रुग्णांवर उपचार करण्यात येणार असून आगामी काळात या कोविड सेंटरला कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ्था नारायणा हे ३० ऑक्सिजन काँसंट्रेटर्स पुरवणार आहेत. तसेच, येथे एक्स रे, लॅब्स तसेच इतर सुविधासुद्धा सुरु करण्यात येणार आहेत

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा