रमजान ईदच्या खरेदीच्या निमित्ताने एका २० वर्षीय तरुणीला वांद्रे येथील बॅंडस्टॅंड येथे आणून तिच्यावर बळजबरीने तिघांनी लैगिंग अत्याचार केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी तीन जणांना गोवंडी येथून अटक केली असून त्याच्याविरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा :
…आणि केशरी रंगाच्या ट्रंकमुळे सापडले मारेकरी
वर्ध्यात तयार होणार म्युकरमायकोसिसवरील औषध
आता तरी कोकणवासींना पुन्हा निसर्गाच्या हवाली सोडू नका
ग्लोबल टेंडरच्या बाबतीत ठाकरे सरकार फक्त दिवस ढकलतंय
पीडित तरुणी आणि आरोपी हे गोवंडी शिवाजी नगर परिसरात राहण्यास आहेत. आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांना ओळखत असून १२ मे रोजी या तिघांनी मुलीला ईदसाठी खरेदी करण्याच्या निमित्ताने घरातून बाहेर काढले होते. गोवंडी शिवाजी नगर येथे दुकाने बंद असून आपण वांद्रे येथे लिंकिंग रोड येथे खरेदीसाठी जाऊ असे सांगून तिघेही या तरुणीला वांद्रे बॅंडस्टॅंड येथे घेऊन आले.
जवळच एका खडकात या तरुणीला आणून तिघांनि तिच्यावर आळीपाळीने लैगिंग अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितले तर जीवे मारू, अशी धमकी तिघांनी या तरुणीला दिली होती. घरी आल्यावर तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाबाबत तिने आपल्या वडिलांना सांगितले. वडिलांनी ताबडतोब वांद्रे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. वांद्रे पोलीसानी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून शिवाजी नगर येथून या तीन आरोपीना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक जण १९ वर्षाचा असून इतर दोघे २२ आणि २३ वर्षाचे आहेत.
कोरोनामुळे लॉकडाउन लागलेला असताना दुकाने बंद आहेत, लोकांचीही वर्दळ कमी आहे, हे लक्षात घेऊन अशा घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.