22 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरक्राईमनामाक्लीनअप मार्शलनी लुटले कारखानदाराला

क्लीनअप मार्शलनी लुटले कारखानदाराला

Google News Follow

Related

२० हजारांच्या खंडणीप्रकरणी चौघे अटकेत

मुंबई महानगरपालिकेने मास्कच्या कारवाईसाठी नेमलेल्या क्लीनअप मार्शल यांची रस्त्यावरील लूट थांबवली असून त्यांनी आता कारखानदार, उद्योजक यांना आपले लक्ष्य केले आहे. अंधेरी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या इंडस्ट्रीजमध्ये या क्लीनअप मार्शलनी शिरकाव करून लूट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका उद्योजकाला तुम्ही कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे सांगून एक लाख रुपयाची मागणी करणाऱ्या मनपाच्या चार क्लीनअप मार्शलना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी एक क्लीनअप मार्शल पोलीस हवालदाराच्या भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रमोद माने, विशाल सूर्यवंशी, दादासाहेब गोडसे, आकाश गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे असून अजित सिंग हा त्याच्या साथीदार फरार आहे. अटक करण्यात आलेले चौघे मनपाने ठेकेदारी पद्धतीने नेमण्यात आलेले कंत्राटी क्लीनअप मार्शल आहेत. या क्लीनअप मार्शल यांना रस्त्यावर थुंकणारे व विनामास्क फिरणाऱ्यावर २०० रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईचे आदेश मनपाने दिले आहे. रस्त्यावर २०० रुपये जमा करण्यापेक्षा मोठा हात मारण्याच्या उद्देशाने क्लीनअप मार्शलच्या या टोळीने अंधेरी पूर्व एमआयडीसी येथे असणाऱ्या इंडस्ट्रीज येथे असणाऱ्या लघु उद्योजकांना लक्ष्य केले. हे पाच जण येथील कारखान्यात जाऊन आम्ही मनपाचे अधिकारी असून तुम्ही कोरोनाचे नियम मोडत असून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगत या लघु उद्योजकाकडून हजारो रुपयाची खंडणी उकळत होते.
ई कॉमर्स व्यवसायिक अनिल बनवारीलाल यांचे या ठिकाणी एक युनिट असून या युनिटमध्ये काही कर्मचारी काम करतात. काही दिवसापूर्वीच अजित सिंग हा अनिल बनवारीलाल यांच्या युनिटमध्ये आला आणि मनपा अधिकारी असल्याचे सांगून तुम्ही कोरोनाचे नियम पळत नाही असे सांगून बनवारीलाल यांच्याकडून १ लाखाची खंडणीची मागणी केली. तडजोड करता ही रक्कम २० हजारवर आली. आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणू बनवारीलाल यांनी २० हजार देऊन पिच्छा सोडवला. अजित सिंग यांनी इतर क्लीनअप मार्शल यांना पैसे कमवण्याचा नवीन धंद्याची माहिती दिली आणि त्यांना बनवारीलाल यांच्याकडे पाठवले. शुक्रवारी प्रमोद माने, विशाल सूर्यवंशी, दादासाहेब गोडसे, आकाश गायकवाड हे चौघे बनवारीलाल यांच्या युनिटवर आले त्यांनी अजित सिंग यांचे माणसे असल्याचे सांगून मुंबई महानगर पालिकेचे ओळखपत्र दाखवून गुन्हा दाखल न करण्यासाठी बनवारीलाल यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र यावेळी बनवारीलाल यांना संशय येताच त्यांनी पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला फोन केला असता या चौघांनी तेथून पळ काढला. बनवारीलाल यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शनिवारी या चौघांना अटक एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा