खान मार्केट प्रकरणात अवैधरित्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रकरणात नवनीत कार्ला याला कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने नवनीत कार्लाचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावला आहे.
दिल्ली न्यायालयाच्या न्यायमुर्ती सुब्रमणीयम प्रसाद यांच्या एक सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी या खंडपीठाने कार्लाचा अटकपूर्व जामिन फेटाळून लावला आहे. वरिष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु संघवी यांनी कार्लाची बाजू मांडली. त्यावेळी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी विनंती केली. परंतु ते न्यायालयाला या बाबत पटवून देण्यात अयशस्वी ठरले.
या सुनावणीदरम्यान ॲडिशिनल सॉलिसीटर जनरल एस व्ही राजू यांनी दिल्ली पोलिसांची बाजू न्यायालयासमोर मांडली. यावेळी त्यांनी या अटकपूर्व जामिनात एवढे विशेष काय आहे असा सवाल देखील केला. या बाबतीत काल संध्याकाळी ७ वाजता देखील सुनावणी झाली, त्याशिवाय आज ईद असून देखील पुन्हा सुनावणी होत आहे. तर या अटकपूर्व जामिनाच्या अर्जात एवढे विशेष काय असा सवाल त्यांनी न्यायालयासमोर केला.
हे ही वाचा:
जयंत पाटील मुख्य सचिवांवर संतापलेच नाहीत
केंद्राप्रमाणे राज्यानेही याचिका दाखल करावी
दक्षिण कोरियाकडून भारताला वैद्यकीय मदत
यानंतर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतला. त्यावर कोणत्याही प्रकारचा अटकपूर्व जामिन देण्यास न्यायालयाने नकार तर दिलाच, शिवाय एस व्ही राजू यांच्या विनंतीनुसार या प्रकरणातील सुनवाई १८ मे पर्यंत स्थगित देखील केली.
या युक्तिवादामध्ये एस व्ही राजू यांनी अशी भूमिका मांडली की, कार्ला याचा अटकपूर्व जामिन मंजूर झाल्यास अवैधरित्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा साठा करणाऱ्यांत चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे हा जामिन फेटाळला जाण्यात मोठी मदत झाली होती.
यापुर्वी गुरूवारी सत्र न्यायालयाने कार्लाचा अटकपूर्व जामिन फेटाळला होता. त्याच्यानंतर कार्ला उच्च न्यायालयात गेला होता आणि उच्च न्यायालयाने कालच त्याचा अटकपूर्व जामिन फेटाळून लावला.
दिल्ली पोलिसांनी ८ मे रोजी खान मार्केटमधून तब्बल १०५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स जप्त केले. हे कॉन्सन्ट्रेटर्स खान मार्केटमधील खान चाचा आणि टाऊन हॉल या रेस्टॉरन्टमध्ये अवैधरित्या साठवून ठेवण्यात आले होते. या दोन्ही रेस्टॉरन्टचा मालक नवनीत कार्ला याच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.