कर्नाटकातील मडिकेरी येथील एका ३५ वर्षीय भाजपा कार्यकर्त्याने गुरुवारी रात्री उशिरा बेंगळुरूमध्ये आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय सोमय्या यांनी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर एक सुसाईड नोट पोस्ट केल्यानंतर काही वेळातच ते नागावरा येथील त्यांच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळले. हजार शब्दांपेक्षा जास्त शब्द असलेल्या या चिठ्ठीत राजकीय घडामोडींना थेट जबाबदार धरण्यात आले आहे. शिवाय चिठ्ठीत अनेक काँग्रेस नेत्यांची नावे देण्यात आली आहेत. काँग्रेस नेत्यांवर छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विनय यांनी त्याच्या सुसाईड नोटमध्ये दावा केला आहे की, त्यांना “कोडागु प्रॉब्लेम्स अँड सजेशन्स” नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपचा ऍडमिन बनवण्यात आले होते. त्याच्या पाच दिवस आधी या ग्रुपवर एक वादग्रस्त मेसेज पोस्ट करण्यात आला होता. या मेसेजचा विनय यांच्याशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, तरीही त्यांना मेसेजसाठी जबाबदार धरण्यात आले आहे आणि त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला, ज्यामुळे तो लोकांच्या नजरेत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले.
विनय यांनी आरोप केला की, एफआयआर राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि काँग्रेस नेते टेनीरा महेना यांनी कोडगूमध्ये त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांच्या फोटोसह प्रकरणाची माहिती जाणूनबुजून प्रसारित केली. महेना यांनी विनयविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर मडिकेरी टाउन पोलिसांनी त्यांना अलिकडेच अटक केली होती.
हे ही वाचा :
रामनवमी मिरवणुकीला विरोध करणाऱ्या ममतांना फटका, न्यायालयाची परवानगी
१५९ तास कार्यरत राहिल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्त; वक्फसह १६ विधेयके मंजूर
काँग्रेस वक्फ सुधारणा विधेयकाला देणार सर्वोच्च न्यायालयात आव्हान
वक्फचे समर्थन करणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला तुडवले, संभलमधील घटना
चिठ्ठीत विनय यांनी दावा केला आहे की, राजकीयदृष्ट्या प्रेरित व्यक्तींनी केवळ त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला नाही तर त्याला पुन्हा गुन्हेगार म्हणून स्थापित करण्यासाठी त्याच्याविरुद्ध खोटे खटले दाखल करण्याची योजना आखली आहे. त्याने हरीश पूवय्या नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख केला, जो वारंवार दुसऱ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बदनामीकारक संदेश आणि त्याचे छायाचित्र पोस्ट करत होता. या सर्व लोकांना शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून माझ्या मृत्यूला न्याय मिळेल, असे त्याने लिहिले.