झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातील एका मंदिरात मोठ्याने भजन वाजवण्यावरून हिंदू आणि मुस्लिम लोक एकमेकांशी भिडले. सांगितले जात आहे की मंदिरात मोठ्याने भजन लावले जात होते, ज्यावर मुस्लिम पक्षाने आक्षेप घेतला. यानंतर वाद सुरू झाला आणि प्रकरण आणखी चिघळले. मिळालेल्या माहितीनुसार, रामनवमीच्या तयारीसाठी भजन-कीर्तनाचे आयोजन केले जात होते. या घटनेनंतर धारियाडीह परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हे संपूर्ण प्रकरण गिरिडीह जिल्ह्यातील धारियाडीह गावचे आहे. या ठिकाणी ३१ मार्च रोजी रात्रीच्या वेळी दोन पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि दगडफेकही झाली. पोलिस पथकाच्या उपस्थितीतही दगडफेकीच्या घटना घडल्या. या काळात, पोलिस गुन्हेगारांचा पाठलाग करत राहिले. या दगडफेकीत सुमारे ६ जण जखमी झाले आहेत.
काही कट्टरवाद्यांकडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, घटनेची माहिती मिळताच प्रशासन तातडीने सक्रिय झाले. शहर पोलिसांसह मुफस्सिल पोलिस स्टेशनही घटनास्थळी पोहोचले आणि वाद वाढवणाऱ्या लोकांना हाकलून लावले. पोलिसांच्या कडक भूमिकेनंतर परिस्थिती सामान्य झाली. घटनेची माहिती मिळताच, डीसी नमन प्रियश लाक्रा आणि एसपी डॉ. बिमल कुमार यांनी तात्काळ सर्व अधिकाऱ्यांना धारियाडीहला पोहोचण्याच्या सूचना दिल्या.
हे ही वाचा :
चिलीच्या राष्ट्राध्यक्षांना मोदींनी समजावला अशोक चक्राचा अर्थ!
पालकांना ठाऊक नाही, कुठे आहे कुणाल कामरा?
पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही!
वक्फवर चर्चा करण्यापेक्षा विरोधकांची पळापळ
पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचताच गुन्हेगारांचा शोध सुरू करण्यात आला. त्याचबरोबर लोकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन पक्षांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली होती. परिस्थिती ताबडतोब नियंत्रणात आणण्यात आली असून सध्या परिस्थिती सामान्य आहे.