29 C
Mumbai
Wednesday, April 2, 2025
घरराजकारणविधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे

विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे

अण्णा बनसोडे यांची एकमताने निवड

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी महायुतीच्या वतीने केवळ अण्णा बनसोडे यांचा अर्ज आला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवार, २६ मार्च रोजी याबाबतची अधिकृत घोषणा केली.

विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या राजकुमार बडोले, संजय बनसोडे आणि अण्णा बनसोडे या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि यावेळी मंत्रीपदाची अपेक्षा असलेल्या अण्णा बनसोडे यांना अजितदादांनी उपाध्यक्षपदाची संधी दिली. उपाध्यक्षपदासाठी महायुतीकडून अण्णा बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता. हा अर्ज सोमवारी दुपारी झालेल्या पडताळणीत वैध ठरला. त्यामुळे त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचे सभागृहात अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. अण्णा बनसोडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला.

हे ही वाचा..

प्राथमिकता क्षेत्र कर्ज मार्गदर्शक तत्त्वांमधील सुधारणा अर्थव्यवस्थेला चालना देईल

तुंगनाथ मंदिर मार्गावर जखमी युवकाचा यशस्वी बचाव केला

युवा लेखकांना मिळणार संधी; PM YUVA 3.0 कार्यक्रमाची घोषणा

मुंबईत मराठी न बोलल्याने दिला चोप

राजकारणात येण्यापूर्वी अण्णा बनसोडे हे पानटपरी चालवायचे. यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले आणि १९९७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक बनले. अण्णा बनसोडे यांनी महापालिकेत तीन टर्म नगरसेवक म्हणून काम केले. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवले. २०१४ मध्ये झालेला पराभव वगळता ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर त्यांनी अजित पवारांची साथ दिली आणि २०२४ मध्ये ते तिसऱ्यांदा विधानसभेवर पोहोचले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
239,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा