संभल येथील सपा खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश विशेष तपास पथकाने (एसआयटी) खासदार झियाउर रहमान बर्क यांना २४ नोव्हेंबर रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान संभलच्या शाही जामा मशिदीत झालेल्या हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपाखाली त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी नोटीस सोपवली.
न्यायालयाने २४ नोव्हेंबर रोजी आदेश दिलेल्या मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान संभल येथील शाही जामा मशिदीत झालेल्या हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपाखाली खासदार झियाउर रहमान बर्क यांना नोटीस देण्यासाठी एसआयटीचे पथक मंगळवारी (२५ मार्च) नवी दिल्लीत पोहोचले. एसआयटीच्या पथकाने वेस्टर्न कोर्टातील खासदारांच्या वसतिगृहात जाऊन बर्क यांना नोटीस दिली. झियाउर रहमान बर्क यांनी याबाबत एएनआयशी बोलताना सांगितले की, त्यांना कलम ३५ (३) अंतर्गत नोटीस मिळाली आहे आणि खासदार म्हणून ते गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या संभल हिंसाचाराच्या चौकशीत अधिकाऱ्यांना सहकार्य करतील.
गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी संभलच्या शाही जामा मशिदीत हिंसाचार झाला होता ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. मुरादाबादचे पोलिस आयुक्त यांनी संभल हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपाखाली झियाउर रहमान बर्क आणि स्थानिक आमदाराच्या मुलाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. हिंसाचारानंतर ८०० लोकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. झियाउर रहमान बर्क आणि सोहेल इक्बाल यांना आरोपी बनवण्यात आले होते. त्यांनी जमावाला भडकावल्याचा आरोप आहेत.
हे ही वाचा :
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर सीबीआयकडून छापेमारी
कर्जतचे फार्म हाऊस, ड्रग्ज, मुलांचे लैंगिक शोषण मेंदू गरगरवणारे आरोप…
सोने खरेदीसाठी हवालाद्वारे पाठवलेल्या पैशांचा वापर केल्याची रान्या रावची कबुली
संभलचे खासदार यांनीही ही घटना पूर्वनियोजित असल्याचे म्हटले होते. घटना अत्यंत दुर्दैवी असून ही पूर्वनियोजित घटना आहे. देशभरात मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे आणि स्वातंत्र्यानंतर अशी वाईट परिस्थिती कधीही घडली नाही. ज्या पद्धतीने प्रार्थनास्थळ कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. एकामागून एक याचिका दाखल केल्या जात आहेत आणि त्याच दिवशी सुनावणी होत आहे आणि आदेशही येत आहेत, त्याच दिवशी डीएम आणि एसपी यांनी जाऊन सर्वेक्षण केले. लोकांना नमाज अदा करण्यापासून रोखण्यात आले.