छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा प्रकार छत्रपती संभाजी नगरमध्ये घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन मुस्लीम तरुणांना अटक केली आहे. या दोनही मुस्लीम तरुणांनी महाराजांविषयी आक्षेपार्ह भाष्य करणारी एक रील इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. या प्रकरणी दोघांविरोधात छत्रपती संभाजी नगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचे पोस्टर लावून छत्रपती संभाजीनगरमधील दोन मुस्लीम तरुणांनी आक्षेपार्ह भाष्य करणारी रील इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. या प्रकरणी जोहेब शोएब पठान आणि तौफिक अहमद इद्रीस या दोघांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली. रील व्हायरल झाल्यानंतर दोघांवर कारवाई मागणी होवू लागली. या प्रकरणी दोघांविरोधात तक्रार दाखल होताच पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आणि त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
हे ही वाचा :
नागपूर हिंसाचार: पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत ८० जणांना घेतलं ताब्यात
इस्रायलकडून गाझा पट्टीवर हवाई हल्ला
विरोधात बोलाल तर नग्न करून मारीन…
वेळ आली आहे ‘औरंगजेब’ला उखडायचंय!
दरम्यान, मुंबईमध्ये देखील अशीच घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका २६ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. अरबाज खान असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. विक्रोळीमधील पार्कसाईट पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरु आहे.